महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सुंदर परंतु निर्जन असणारे बेट

06:37 AM Jul 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेकडो वर्षे जुने रहस्य आहे कारणीभूत

Advertisement

समुद्रकिनारा आणि बेटाचे नाव ऐकताच अनेकांचे चेहरे खुलतात. शांत आणि सुंदर समुद्र किनारे असलेल्या जागेच्या शोधात लोक असतात. एक असेच बेट आहे जे सुंदर आहे, परंतु तेथे कुणीच जाऊ शकत नाही. यामागील कारणही तितकेच रंजक आहे.

Advertisement

स्कॉटलंडमध्ये एक असेच दुर्गम बेट असून ते अत्यंत निर्जन आहे. स्कॉटलंडच्या किनाऱ्यापासून एक किलोमीटर अतंरावर असलेल्या या ठिकाणाला पाहून तुम्ही मोहित होऊ शकता, परंतु तेथे जाऊ शकत नाही. 1940 च्या दशकापासून या बेटावर कुठलाच मनुष्य गेलेला नाही.

या बेटाचे नाव ग्रुइनार्ड असून ते लेड आणि उल्लापूलनजीक आहे. या बेटाच्या शापित असण्यामागील कहाणी दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित आहे. त्यादरम्यान ब्रिटिश नेते चर्चिल यांनी जर्मनी एखादे जैविक अस्त्र निर्माण करत असल्याचा संशय होता. अशा स्थितीत त्यांनी स्वत:च्या वैज्ञानिकांना अशाप्रकारचे अस्त्र निर्माण करण्याचा आदेश दिला होता. ब्रिटिश वैज्ञानिकांनी एंथ्रॉक्स नावाचे अस्त्र निर्माण केले, ज्याचे परीक्षण ग्रुइनार्ड बेटावर झाले. याचमुळे येथीलमातीत या धोकादायक आजाराचे बॅक्टेरिया आहेत. याच्या संपर्कात आल्यास माणूस आजारी पडू शकतो.

बेटाच्या मालकाच्या अनुमतीनंतरच येथे एंथ्रॉक्स बॉम्बचे परीक्षण झाले होते. याचे परीक्षण देखील बकऱ्यांच्या कळपाला तेथे ठेवून करण्यात आले होते. बॉम्बच्या विस्फोटानंतर बकऱ्या मृत पावल्या तर त्यांचे अवशेष जळाले. यानंतरच येथील माती विषारी ठरली आहे. परंतु या बॉम्बचा वापर जर्मनीविरोधात झाला नाही. पण 1981 मध्ये येथील विषारी मातीविषयी अनेक अहवाल समोर आले. यानंतर परीक्षण झाले असता बेटावरील माती अद्याप जैविक अस्त्राच्या विषापासून मुक्त झाली नसल्याचे स्पष्ट झाले. हे विष साफ करण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात आला, येथील सर्व सागरी जीवांना मारून टाकण्यात आले होते.

प्रयत्न ठरले नाहीत यशस्वी

2007 मध्ये पुन्हा एकदा या ठिकाणाला सागरी जीवांसाठी विकसित करण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यात यश आले नाही. त्यानंतर शेळ्यांचा एक कळप तेथे आणला गेला, जो जिवंतही राहिला. परंतु 2022 मध्ये येथे भीषण आग लाग लागली होती. बेटाचे मालक ग्रुइनार्ड इस्टेटकडून जंगलातील आग बेटासाठी लाभदायक ठरल्याचा दावा करण्यात आला होता. तरीही या बेटावर  स्थायिक होण्याचा विचार कुणी करत नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article