सावंतवाडीत एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांकडून प्राध्यापकाला मारहाण
सावंतवाडी प्रतिनिधी
उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे समर्थक मतदार असल्याच्या संशयावरून एका प्राध्यापकाला शुक्रवारी रात्री एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकांनी शिविगाळ करून मारहाण केली. हा प्रकार सावंतवाडी शहरातील एका भागात घडला. याबाबत संबंधित प्राध्यापकाने पोलीस ठाण्यात धाव घेत या तिघांविरोधात तक्रार दिली असून त्यानुसार तिघांवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. हे तिघेही जण एका अपक्ष उमेदवाराशी संबंधित असल्याचे प्राध्यापकाने पोलिसांना सांगितले. सदर प्राध्यापक शुक्रवारी रात्री आपल्या इमारतीच्या खाली आपल्या मित्रांसमवेत थांबले होते. त्यावेळी प्रचार करण्यासाठी हे तिघे जण आले होते. मताचा कल जाणून घेण्यासाठी त्या तिघांनी प्राध्यापकांना धमकावले. तुम्ही मत कोणाला घालणार असा प्रश्न विचारला. तसेच त्यांनी हे प्राध्यापक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समर्थक असल्याने ते आमच्या उमेदवाराला मत देणार नाही असे सांगून या प्राध्यापकाला शिवीगाळ केली तसेच मारहाणही केली. तुम्हाला याची किंमत मोजावी लागेल अशी धमकी दिली .तसेच प्राध्यापकाच्या शर्टची कॉलर पकडून त्यांना तेथे जवळ असलेल्या गाडीजवळ ढकलून दिले. तसेच पुन्हाही धमकी दिली .यासंदर्भात सदर प्राध्यापकाने पोलिसात तक्रार दिली आहे .पोलिसांनी तिघांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. संबंधित तिघेजण एका अपक्ष उमेदवाराचे समर्थक असल्याचे प्राध्यापकाने सांगितले.