एसटी कर्मचाऱ्यांची क्रिकेटच्या मैदानात फटकेबाजी !
सावंतवाडीत एसटी महामंडळातर्फे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी
दररोज प्रवाशांची सेवा करत हाती एसटीचे स्टेअरिंग आणि प्रवाशांचे तिकीट काढण्यात व्यस्त असलेलया वाहक -चालकांच्या हाती बॅट , बॉल आणि पॅड पाहायला ,मिळाला . क्रिकेटच्या पेहरावात एसटी महामंडळाचे वाहक -चालक आज सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर एकत्र आले होते . नेहमी खाकीवर्धित दिसणारे हे वाहक -चालक प्रथमच पांढऱ्या शुभ्र गणवेशात मैदानावर आपली फटकेबाजी करत होते . निमित्त होतं ते एसटी महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातर्फे लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे. एसटी महामंडळातील चालक ,वाहक आणि मेकॅनिकल तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी कर्मचारी हे रोज प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर असतात. मात्र ,त्यांना विरंगुळा मिळावा ,त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. यासाठी एसटी महामंडळाने या कर्मचाऱ्यांसाठी खास लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर करण्यात आले आहे. ५ ते ८ डिसेंबर या कालावधीत एसटी महामंडळाचे नऊ संघ सहभागी झाले आहेत. दोन दिवसात झालेल्या क्रिकेट स्पर्धेत सांगली, सोलापूर ,रत्नागिरी ,या एसटी महामंडळाच्या विभागाने पुढील प्रवेश केला आहे. सिंधुदुर्ग एसटी महामंडळातर्फे सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर तीन दिवसीय या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा एसटी विभागाचे जिल्हाधिकारी अभिजीत पाटील,यांनी केले . यावेळी सावंतवाडी एसटी विभागाचे अधिकारी श्री गावित ,शशिकांत प्रभू ,अमोल चव्हाण ,सागर चिकोडी आधी उपस्थित होते. तीन दिवस सुरू असलेल्या या क्रिकेट स्पर्धेत पंच म्हणून महेश डोंगरे आणि सुरज कारिवडेकर हे काम पाहत आहेत.