Sangli Crime | आटपाडीत मारहाण; दोन तोळ्याची सोन्याची चेन लंपास
03:18 PM Feb 23, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
झरे गावात तरुणावर हल्ला
Advertisement
आटपाडी -झरे येथील अशोक शामराव भानुसे यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन तोडून नेल्याप्रकरणी स्वप्निल उर्फ नवनाथ आप्पा पाटील, प्रशांत उत्तम गलांडे (रा. झरे) यांच्यासह अन्य तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल आहे.
२० फेब्रुवारी रोजी अशोक भानुसे अथर्व जेंटस पार्लर दुकानातून दाढी करुन बाहेर येत होते. तेंव्हा स्वप्नील उर्फ नवनाथ आप्पा पाटील व प्रशांत गलांडे व अनोळखी तिघांनी मारहाण दोन तोळ्याची सोन्याची चेन हिसकावून नेली.
Advertisement
Advertisement