For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय बाजारातील घसरण सत्र कायम

06:22 AM May 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय बाजारातील घसरण सत्र कायम
Advertisement

सेन्सेक्सची 667.55 तर निफ्टी 183.45 अंकांनी नुकसानीत

Advertisement

मुंबई :

भारतीय भांडवली बाजारातील सलग चौथ्या सत्रात बुधवारी पुन्हा सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसह बंद झाले आहेत. लोकसभा निवडणुकीचे टप्पे समाप्त झाले असून आता फक्त एकच टप्पा शिल्लक असून तो पूर्ण झाल्यानंतर 4 जून रोजी अंतिम निकाल जाहीर होणार आहे. मात्र या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडी होत आहेत. यात बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक हे सलगपणे घसरणीत राहिले आहेत. कारण गुंतवणूकदार कोणतीही जोखीम घेण्यात तयार नसल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली आहे. विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांकडून मोठ्या प्रमाणात विक्री केली जात असून अमेरिकन बॉण्ड यील्डमध्येही मजबूत स्थिती निर्माण होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मुख्य कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 667.55 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 74,502.90 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय  शेअर बाजाराचा निफ्टी हा 183.45अंकांनी नुकसानीचा प्रवास करत निर्देशांक 22,704.70 वर बंद झाला आहे.

ब्लूमबर्गच्या एका अहवालानुसार मोदी सरकार 303 जागांवर विजय प्राप्त करु शकल्यास भारतीय बाजारातील समभागांना चांगली संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे आता 4 जून रोजी लोकसभा निकाल कशा पद्धतीने लागणार त्यावरच आगामी काळातील बाजारांची दिशा निश्चित होणार असल्याची गणिते ठरणार असल्याचे काही अभ्यासकांनी म्हटले आहे.

बीएसई सेन्सेक्समध्ये बुधवारी पॉवरग्रिड कॉर्पचे समभाग हे 1.52 टक्क्यांनी वधारले आहेत. यासोबतच सनफार्मा, नेस्ले इंडिया, आयटीसी, भारती एअरटेल आणि इंडसइंड बँक, यांचा नंबर लागतो. अन्य कंपन्यांमध्ये टेक महिंद्रा 2.35 टक्क्यांनी प्रभावीत झाला आहे. तर बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस यासारख्या कंपन्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

काही क्षेत्रांची कामगिरी

भारतीय बाजारात वाहन क्षेत्रात काहीसी तेजी राहिली तर बँकिंग व आयटी क्षेत्रातील समभागात तेजी राहिली होती. सोमवारच्या सत्रात सेन्सेक्स व निफ्टी यांचे इंट्राडेच्या दरम्यान दोन्ही निर्देशांकांनी भक्कम कामगिरी केली होती. मात्र बुधवारच्या सत्रात गुंतवणूकदारांनी अंतिम क्षणी मोठ्या प्रमाणात नफा वसुली केल्याचे दिसून आले.

Advertisement
Tags :

.