For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताचे आधारस्तंभ वाचविण्यासाठी डोळस बना !

12:01 PM Jan 25, 2026 IST | अनुजा कुडतरकर
भारताचे आधारस्तंभ वाचविण्यासाठी डोळस बना
Advertisement

प्रजापिता ब्रह्मकुमारीज इश्वरीय विश्वविद्यालयाचे व्याख्याते डॉ. सचिन परब यांचे प्रतिपादन : 'टेंशन फ्री जीवन आणि व्यसनमुक्ती' विषयावर व्याख्यान

Advertisement

प्रतिनिधी / वेंगुर्ले

वेंगुर्त्यात ड्रग्ससारख्या जीवघेण्या व्यवसानाचा विळखा पडू लागला आहे. भारताचे उद्याचे आधारस्तंभ खिळखिळे बनविण्यासाठी विविध आमिषे देऊन त्यांना व्यसनाकडे वळविणारी एक अदृश विघातक शक्ती सक्रिय झाली आहे. या शक्तीपासून आपल्या घरातील मुलांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने डोळस व्हायला हवे. आपल्या घरातील भावी पिढी सुरक्षित करावी. कारण तुमची मुले तुमचेच अनुकरण करत असतात. सुधारण्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून सुरू करावी, असे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारीज इश्वरीय विश्व विद्यालयाच्या व्यसनमुक्ती अभियानाचे संयोजक डॉ. सचिन परब यांनी वेंगुर्ले येथे स्पष्ट केले.

Advertisement

वेंगुर्ले नगर पालिका आणि माणिकचौक येथील प्रजापिता ब्रह्मकुमारीज इश्वरीय विश्व विद्यालयाच्या वेंगुर्ले शाखेच्यावतीने आयोजित केलेल्या 'टेंशन फ्री जीवन आणि व्यसनमुक्ती' या विषयावर ते बोलत होते. वेंगुर्ले पालिकेच्या स्वामी विवेकानंद कौशल्य विकास समागृहात झालेल्या या व्याख्यान सत्राचे उद्घाटन नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, प्रजापिताच्या वेंगुर्ले केंद्राचे साधक शुभभाई, नगरसेविका ॲड. सुषमा प्रभूखानोलकर, गौरी मराठे, लीना म्हापणकर, रिया केरकर, पत्रकार संघाचे सदस्य महेंद्र मातोंडकर आदी उपस्थित होते.प्रजापिता ब्रह्मकुमारीज इश्वरीय विश्व विद्यालयामार्फत व्यसनमुक्ती अभियान संपूर्ण देशभर राबविण्यात येत आहे. यातून विद्यार्थ्यांना व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी संस्कार रुजविण्याचे काम सुरू आहे. देशाची अखंडता नष्ट करून देशात अराजकता निर्माण करण्यासाठी देशविघातक शक्तींकडून विविध कारनामे सुरु आहेत. यात सर्वांत घातक काय असेल तर ते देशातील विद्यार्थ्यांना व्यसनाधिन करणे व्यसनाच्या खाईत अडकलेल्या विद्यार्थ्यांना वाचविणे हीच प विमिकता ठरवून प्रजापितातर्फे हे अभियान सुरू आहे. व्यसनमुक्तीच्या या चळवळीत वेंगुर्लातील नागरिकांचाही सहभाग वाढायला हवा. डॉ. सचिन परब व्याख्यानादरम्यान म्हणाले यांनी वेंगुर्ले येथे स्पष्ट केले.

भारत हा महासत्ता होऊ पाहणारा देश आहे. त्यामुळे आपल्या देशाचे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे शत्रू वाढले आहेत. जगाचा संपूर्ण दक्षिण भाग डॅमेज करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीलंका, बांग्लादेश, नेपाळ, भूतान, पाकिस्तान, अफगाणिस्तान या देशांवर फार मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. आता भारताला टार्गेट केले जात आहेत. आंतरराष्ट्रीय देश-विघातक शक्तींकडून दरदिवशी नवनवीन कारनामे सुरू आहेत. आपल्या देशाची अखंडता या शक्तींना पुरून उरली आहे. म्हणूनच देशाच्या अखंडिततेवर घाला घालण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी देशाचे काळीज असलेल्या युवाशक्तीला कमजोर करण्याची कटकारस्वाने सुरू आहेत. त्यांना विविध आमिषे दिली जात आहेत. देशातील विद्यार्थी मोठ्या प -माणावर सायबर कल्चर व व्यसनांमध्ये गुरफटत चालला आहे. त्यांना आताच व्यसनांपासून दूर नाही ठेवले तर देशावर मोठे संकट कोसळणार आहे. या सर्वांचा विचार करूनच देशात मोठे नेटवर्क असलेल्या प्रजापिता ब्रह्मकुमारीज इश्वरीय विश्व विद्यालयामार्फत जनजागृतीचा हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.व्यसनाधिनता संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य बिघडविते. विविध प्रकारच्या टेंशनचे ओझे डोक्यावर घेऊन या टेंशनपासून काहीकाळ दूर राहण्यासाठी व्यसनांचा आसरा घेतात. मात्र, या टेंशनपासून त्यांची मुक्तता कधीच होत नसते. टेंशन घालविण्यासाठी नशापाणी करणारे लोक आपल्यासह आपले कुटुंब, समाज व देशाचेही नुकसान करतात. व्यसनामुळे वाममार्गाला प्रोत्साहन मिळते. त्यातून गुन्हेगारीलाही खतपाणी मिळते. म्हणून मी स्वतः व्यसन करणार नाही आणि सोबतच्या कोणालाच या व्यसानच्या आहारी जाऊ देणार नाही, अशी प्रतिज्ञा प्रत्येकाने करायला हवी, असेही डॉ. सचिन परब म्हणाले,

प्रजापिताचा हा उपक्रम भावी पिढी वाचविण्यासाठी अत्याश्यक आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपालिकेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्धापन दिनाचे औचित्य साधून शहरातील महत्त्वाच्या शाळा, महाविद्यालयांमध्ये लहान मुले व युवकांमध्ये जागृती करण्याचा उपक्रम आम्ही प्रजापिताचे सहकार्य घेऊन राबवू, असे व्याखानानंतर बोलताना नगराध्यक्ष दिलीप गिरप म्हणाले. पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनीही प्रजापिता ब्रह्मकुमारीजमुळे आपल्या जीवनात कसे परिवर्तन झाले याचा उल्लेख करत टेंशन फ्री आयुष्यासाठी व्यसनमुक्ती किती गरजेची आहे यावर विवेचन केले. नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी डॉ. सचिन परब यांचा खास सन्मान केला आभार शुभभाई यांनी मानले. या कार्यक्रमाला नगर पालिकेचे कर्मचारी, खर्डेकर महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी, वेंगुर्ले हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.