कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शिळे अन्न खाऊन काटकसर

07:00 AM May 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मानवी स्वभाव हा अगम्य असतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे. काही लोक स्वभावाने इतके ‘चिक्कू’ असतात की, पैसा खर्च करायची वेळ आली, की त्यांच्या अंगावर काटा येतो. अगदी खाण्यापिण्याच्या बाबतीतही असे लोक शक्य तितका पैसा वाचविण्याचा प्रयत्न करतात. मग कपड्यांच्या खरेदीची बाब तर दूरच राहिली, अशी या लोकांची स्थिती असते. सध्या एका महिलेचा व्हिडीओ प्रसिद्ध होत आहे. ही महिला स्वत:च आपण किती कंजूष आहोत हे सांगत आहे.

Advertisement

या महिलेच्या कंजूषपणाचे प्रकार पाहून लोक आश्चर्याने थक्क होतात. ही महिला अन्नाचा एक कण वाया जाऊ देत नाही. शिळे अन्न किंवा उरलेले नासलेले अन्नही ती खाताना दिसते. अन्न खराब झाले असले तरी ते ती फेकून देत नाही. या अन्नापासून काही पदार्थ बनवून ती ते खाते. याशिवाय इतर अनेक मार्गांनी ती पैसा वाचविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करताना दिसून येते.

Advertisement

मोड आलेले बटाटे, जे प्रकृतीला चांगले मानले जात नाहीत, तेही ती खाते. दुधासाठी जास्त पैसा खर्च करावा लागतो, म्हणून ती दुधाऐवजी अनेक पदार्थांमध्ये पाण्याचा उपयोग करते. बिघडलेली भाजी ती सँडविचमध्ये घालून संपविते. आपल्या या कंजूषपणाचा तिला मोठा अभिमान आहे. अशा प्रवृत्तीमुळेच मी कोणतेही कर्ज न काढता जगू शकत आहे, असे तिचे म्हणणे आहे. या व्हिडीओवरुन या महिलेचे नाव स्पष्ट होत नाही. मात्र, आपला दिनक्रम तिने प्रसिद्ध केल्याने तिच्या या अजब प्रवृत्तीची सर्वत्र चर्चा होत असून लोक उलटसुलट प्रतिसाद देत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article