महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मेट्रोमोनियल साईटवर जोडीदार शोधताय सावधान

03:32 PM Jan 20, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

कोल्हापूरः राजेंद्र होळकर
आपल्याला मनासारखा जोडीदार मिळावा, असा प्रत्येक तरुण-तरुणींची इच्छा असते. मग ती इच्छा पूर्ण करण्यासाठी अनेकजण मेट्रोमोनियल साईटचा पर्याय निवडतात. पण हा पर्याय निवडताना सावधानता नक्की बाळगा. नाही तर तुमची फसवणूक होवू शकते. कारण शादी डॉट कॉम या संकेतस्थळावरुन घटस्फोटीत, विधवा महिलांची फसवणूक करणाऱ्या फिरोज निजाम शेख (मुळ रा. गंगावळण, कळाशी, ता. इंदापूर, जि. पुणे, सध्या रा. आयडियल होम अपार्टमेंट उस्मानिया मजीद जवळ, मिठानगर, कोढावा, जि. पुणे) या लखोबा लोखंडेला पोलिसांनी अटक केली आहे.
फसवणूक करणाऱ्या ठकसेनकडून शादी डॉट कॉम व जीवन साथी डॉट कॉम या सारख्या बनावट विवाह नोंदणी संकेतस्थळ मोबाईल इंटरनेटवर व्हायरल करतात. या विवाह नोंदणी संकेतस्थळावर आपल्या जीवनामध्ये जोडीदार असावा. या विचाराने लग्न करण्याचे ठरवून विवाह इच्छुक महिला व तरुणीकडून प्रोफाइल पाठविले जाते. ती प्रोफाइल पाहून ठकसेनकडून स्वत: उच्च शिक्षित व व्यावसायिक असल्याची खोटी बतावणी करुन, संबंधीत महिला व तरुणींना रिक्वेष्ट पाठवितात. ही रिक्वेष्ट पाहून महिला आणि तरुणींना मनाप्रमाणे स्थळ मिळाल्याने, त्यांच्याकडून ही त्वरीत पसंती (रिक्वेस्ट) कळवली जाते. पसंती कळविल्यांनतर मोबाईल क्रमांकाची देवाण-घेवाण करुन, ठकसेन बोलणे वाढवितात. त्यातून महिला व तरुणींना भुरळ पाडून, त्याच्याशी जवळीकता अजून वाढवितात. त्यांचा विश्वास संपादन करतात. तसेच त्यांच्या परिवरातील सदस्यांचा हे ठकसेन मंडळी विश्वास संपादीत करुन, थोड्याच दिवसात लग्न करु असे आश्वासन देवून आणखीन सलोखा वाढवितात. त्यानंतर त्याच्याकडून आर्थिक लुटमारी व अत्याचार करुन, काही दिवसानंतर ठकसेन मंडळी महिला व तरुणींना टाळायला लागतात. त्यानंतर संबंधीत महिला व तरुणींना आपली फसवणूक झाल्याची चूक त्यांच्या लक्ष्यात येत आहे. अशा पध्दतीने गेल्या काही महिन्यापासून राज्यात महिला आणि तरुणीची फसवणूक करण्यात आल्याच्या घटना उघडकीस येत आहेत.
महिला व तरुणींनो सावधानता
शादी डॉट कॉमवर महिला व तरुणींनी फसवणूक होऊ लागली आहे. त्यामुळे विवाह नोंदणी संकेतस्थळावर ओळख करुन घेवून, कोणी पैश्याची मागणी करीत असेल. तर कोणाला पैसे देवू नये. तसेच शादी डॉट कॉमवऊन लग्नाचे आमिष दाखवून पैसे मागणाऱ्या व्यक्तीकडून सावधान राहिले पाहिजे. त्याचबरोबर शादी डॉट कॉमवरुन फसवणूक झाल्यास संबंधीतानी पोलिसांच्याकडे तक्रार करावी.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article