महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सांतईनेज रस्त्यावर सावधगिरी बाळगावी

12:18 PM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांचे आवाहन : दोन महिन्यात काम होणार पूर्ण

Advertisement

पणजी : सांतईनेज भागातील रस्त्यांच्या दुऊस्तीचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत चालू असून हे काम पुढील दोन महिने चालू राहणार आहे. याठिकाणी मोरी बांधणे तसेच मलनिस्सारणसाठी साधरणत: 1 मीटर खोल विहिरींचे बांधकामही चालू असल्याने नागरिकांनी या रस्त्यावऊन जाताना सावधगिरी बाळगावी असे स्मार्टसिटी अधिकाऱ्यांनी कळविले आहे. सांतईनेज मुख्य रस्ता ते टोंक येथील मलनिस्सारण प्रकल्पाजवळील पूल इथपर्यंत रस्ता सपाटीकरण व इतर कामे चालू आहेत. या रस्त्यावर चरही खोदलेले आहेत. त्यात मोठ्या वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे माती, पाणी व इतर सामग्रीमुळे चालणे, वाहने चालविणे अशक्य होईल. रस्ता पूर्णत: पूर्वपदावर येण्यासाठी दोन महिने लागतील. रस्ता काही ठिकाणी खचण्याचीही शक्यता असल्याने तसे काही आढळल्यास नागरिकांनी मुकूंद मळीक (8806814440) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही स्मार्टसिटी व्यवस्थापनाने केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article