For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सायबर गुन्हा घडण्यापूर्वीच सावध रहावे

11:41 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
सायबर गुन्हा घडण्यापूर्वीच सावध रहावे
Advertisement

नागरिकांनी खबरदारी घ्यावा : सायबर गुन्हा विभागाचे आवाहन : गोव्यात दिवसेंदिवस वाढते प्रमाण

Advertisement

पणजी : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विशेषत: इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या सर्रास गैरवापराने चिंता वाढवली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक लूट मोठ्याप्रमाण होत असून त्याचा फटका समान्य लोकांना बसत आहे. लोक आशेने सायबर गुन्हा विभागाकडे तक्रारी दाखल करतात, मात्र सगळ्dयाच तक्रारी निकालात काढणे पोलिसांना कठीण जात असते. त्यासाठी अशा घटना घडण्यापूर्वीच लोकांनी सावध राहणे गरजेचे आहे, असे आवाहन सायबर गुन्हे विभागाने केले आहे. कुठल्याही प्रकारची आमिषे दाखविणारे फोन येत आले तरीही कोणताही अर्थिक व्यवहार करण्यापूर्वी पोलिसांना कळवा, असे आवाहन सायबर गुन्हा विभागाने केले आहे. इतकेच नव्हे तर पालकांनीही आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे तितकेच गरजेच आहे, असेही म्हटले आहे. सायबर क्राईम पोलिसांनी केरळच्या तऊण अफलाल के. याला अटक करून एक मोठे फसवणूक प्रकरण उघड केले आहे. संशयिताने सांगोल्डा येथील एका व्यक्तीला 1 कोटी 18 लाख ऊपयांना फसविले होते.

शिक्षणसंस्थाही पडल्या बळी

Advertisement

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यामतून विशेषत: इन्स्टाग्राम आणि स्नॅपचॅटच्या सर्रास गैरवापराने अनेकांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी नोंद झाल्या आहेत. ज्यांची फसवणूक झाली त्यात काही शैक्षणिक संस्थांचाही समावेश आहे. सर्वात अलीकडील घटनेत केंद्रीय विद्यालय शिक्षक सदस्यांविऊद्ध पोस्ट केलेल्या अपमानास्पद सामग्रीला बळी पडले. गेल्या डिसेंबरमध्ये, पणजीतील एका प्रतिष्ठित शाळेतील अल्पवयीन मुलींशी जोडलेल्या नऊ इन्स्टाग्राम खात्यांची त्यांच्या शाळेतील सोबत्यांची छेडछाड करणारे व्हिडिओ शेअर केल्याबद्दल तपास करण्यात आला आहे. दुसऱ्या प्रकरणात, एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने असा आरोप केला की स्नॅपचॅट आयडी ‘श्रीपाद’ आणि इतर चार आयडींनी तिच्याशी मैत्री केली, नंतर तिची आक्षेपार्ह चित्रे आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्याच्या आधारे तिने  ‘लैंगिक मागण्या’ पूर्ण न केल्यास ते प्रसारित करण्याची धमकी देऊ लागले होते.

यावर्षी दोन महिन्यांत 13 प्रकरणे

सायबर क्राईम सेलने 2022 मध्ये 49 प्रकरणे नोंदवली आहेत. या वर्षातील अवघ्या दोन महिन्यांत 13 प्रकरणे नोंद केली आहेत. 2021 मध्ये 20 तक्रारी  नोंद केल्या होत्या. 2023 मध्ये 31 तक्रारी नोंदवण्यात आल्या. ही आकडेवारी सायबर विभागाकडे नोंदवलेल्या प्रकरणांची आहे. एनसीआरबीच्या नोंदीनुसार, व्यापक चित्र, 2020 ते 2022 पर्यंत एकूण 166 सायबर गुह्यांच्या प्रकरणांसह पोलीस ठाण्यांमधील संबंधित कल दर्शविते त्यानुसार 2020 मध्ये 40 प्रकरणांची नोंद आहे. 2021 मध्ये 36 प्रकरणे तर 2022 मध्ये 90 प्रकरणे नोंद आहेत. सायबर गुन्ह्यांबरोबरच महिलांच्या सायबर सुरक्षेवरही विशेष भर दिला जात आहे. पोलिस नियंत्रण कक्षाने एक समर्पित सायबर पोर्टल नंबर निर्माण केला आहे. त्याच्यावर विविध फसवणुकीसंबंधित कॉल्स येतात.  क्रेडिट आणि डेबिट कार्ड फसवणूक, बँका अनपेक्षितपणे पैसे काढतात, या तक्रारींची त्वरित नोंद केली जाते आणि बँकांसह संबंधित अधिकाऱ्यांना पुढील कारवाईसाठी सूचित केले जाते. सायबर पोलीस अशा घटनांवरही बारकाईने लक्ष ठेवत आहे. ज्यात शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या अल्पवयीन मुली रिलेशनशिप दरम्यान त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत भडक फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. त्यावऊन त्यांचे शोषण केले जाते, म्हणून त्यांनी अगोदरच असे प्रकार करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :

.