For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बाजारपेठेतील समस्यांवर बीसीसीआयचा पुढाकार

06:32 AM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बाजारपेठेतील समस्यांवर बीसीसीआयचा पुढाकार
Advertisement

पार्किंग, मालवाहतूक, पोलीस तपासणीच्या प्रश्नांवर लवकरच अधिकाऱ्यांसोबत बैठक : चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत निर्णय

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शहराच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या सोडविण्यासाठी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री (बीसीसीआय) पुढाकार घेणार आहे. लवकरच जिल्हा प्रशासन, महापालिका, पोलीस विभाग, लोकप्रतिनिधी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन समस्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन बीसीसीआयने दिले आहे.

Advertisement

रविवार पेठेतील बसवेश्वर बँकेच्या सभागृहात झालेल्या बीसीसीआय व्यापार समितीच्या बैठकीत व्यापाऱ्यांनी बाजारपेठेतील विविध अडचणी मांडल्या. पार्किंगचा प्रश्न, मालवाहतुकीसाठी जागेचा अभाव व बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्था हे प्रमुख मुद्दे बैठकीत चर्चेत आले. तसेच मुख्य बाजारपेठेत वाहनांसाठी पुरेशी जागा नसल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नरगुंदकर भावे चौकाजवळ बहुमजली पार्किंग उभारण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. तसेच दुकानांसाठी येणारा माल गोदामात पोहोचविणे व उतरविण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने व्यापारी व वाहनचालकांना अडचणी येत असल्याचे सांगण्यात आले.

बाजारपेठेच्या प्रवेशद्वारांवर होणाऱ्या वाहन तपासणीबाबतही व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. तपासणी व दंडात्मक कारवाईमुळे ग्राहक बाजारात येण्यास कचरतात. त्यामुळे व्यापारावर परिणाम होत असल्याचा मुद्दा मांडण्यात आला. कायदेशीर तपासणीला विरोध नसून बाजारपेठेतील व्यापार व वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशापद्धतीने व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली.

मेघा गॅसच्या सेवांबाबत तसेच सणासुदीच्या काळातील जीएसटी तपासणीबाबतही व्यापाऱ्यांनी तक्रारी मांडल्या. व्यापाऱ्यांच्या समस्यांवर संबंधित विभागांशी चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी बीसीसीआय प्रयत्न करेल. तसेच व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरात लवकर बैठक घेऊ, असे आश्वासनही पदाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी सरला हेरेकर, संजीव कत्तीशेट्टी, उदय जोशी, राजेंद्र मुतगेकर, मनोजकुमार मत्तीकोप्प, सुधीर चौगुले, रमेश लद्दड यांच्यासह पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.