For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सचिन तेंडुलकरला बीसीसीआयचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार

06:36 AM Feb 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
सचिन तेंडुलकरला बीसीसीआयचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला जीवन गौरव पुरस्काराने बीसीसीआय सन्मानित करणार आहे. आज शनिवारी बीसीसीआयच्या वार्षिक सोहळ्यात त्याला सन्मानित करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने सांगितले.

51 वर्षीय तेंडुलकरने भारतातर्फे एकूण 664 आंतरराष्ट्रीय खेळले असून कसोटी व वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा जमविण्याचा विश्वविक्रम त्याने नोंदवला आहे. ‘2024 या वर्षासाठी त्याला सीके नायुडू जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे,’ असे मंडळातील सूत्राने सांगितले. 1994 पासून हा पुरस्कार भारताचे पहिले कर्णधार कर्नल सी.के. नायुडू यांच्या नावे दिला जात असून हा पुरस्कार मिळविणारा तेंडुलकर हा 31 वा क्रिकेटपटू आहे. नायुडू यांनी 1916 ते 1963 या 47 वर्षाच्या विश्वविक्रमी कारकिर्दीत त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केले होते.

Advertisement

तेंडुलकरने 200 कसोटी व 463 वनडे सामने खेळले असून हाही विक्रम आहे. कसोटीत त्याने 15921 तर वनडेत 18426 धावा जमविल्या. मात्र त्याने फक्त एक आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. 2023 मध्ये भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री व माजी यष्टिरक्षक फारुख इंजिनीयर यांनी जीवनगौरव पुरस्कार सन्मानित करण्यात आले होते.

तेंडुलकर हा त्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला गेला. त्याने फक्त धावाच जमविल्या असे नव्हे तर त्याने आयकॉन खेळाडूचा लौकीक मिळविला होता. 1989 मध्ये पाकविरुद्ध कसोटी पदार्पण केल्यानंतर दोन दशकांहून अधिक कालावधीची त्याची कारकीर्द राहिली. त्याच्या नावावर अनेक विक्रम नोंद असून 2011 मध्ये भारताने वनडे विश्वचषक जिंकला, त्या संघाचा तो महत्त्वाचा सदस्य होता. त्याची ती विक्रमी सहावी व शेवटची विश्वचषक स्पर्धा होती. त्याने आपल्या आक्रमक खेळाने प्रतिस्पर्धी गोलंदाजांत दहशत निर्माण केली होती आणि अनेक गोलंदाजांनी तसे बोलूनही दाखविले होते.

Advertisement
Tags :

.