बायरन म्युनिकची फ्लेमेंगोवर 4-2 ने मात
वृत्तसंस्था/ मियामी गार्डन्स, अमेरिका
हॅरी केनने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर बायरन म्युनिकने जलद सुऊवातीचा फायदा घेत क्लब वर्ल्ड कपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत फ्लेमेंगोचा 4-2 असा पराभव केला. जर्मनीच्या या प्रमुख फुटबॉल क्लबने गेल्या आठवड्यात बेनफिकाविऊद्ध झालेल्या एकमेव पराभवानंतर लगेचच पुनरागमन केले आणि 2-0 अशी आघाडी घेतली आणि नंतर क्वार्टरफायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने फ्लेमेंगोकडून चाललेल्या पुनरागमनाच्या प्रयत्नांना रोखले.
बायरन म्युनिक शनिवारी अटलांटामध्ये चॅम्पियन्स लीग विजेत्या पॅरिस सेंट-जर्मेनचा सामना करेल. केनचा पहिला गोल सामना सुरू झाल्यानंतर नऊ मिनिटांत आणि आदळून आलेल्या चेंडूवर होता. त्यानंतर जोशुआ किमिचने पुरविलेल्या पासवर आगुस्तीन रॉसीलाचकवत या उत्कृष्ट गोल स्कोअररने पुन्हा एकदा गोल केला. त्यापूर्वी किमिचच्या कॉर्नरवर फ्लेमेंगोचा स्टार एरिक पुल्गरने चेंडू हेडरद्वारे स्वत:च्याच जाळ्यात टाकला तेव्हा बुंडेसलिगा चॅम्पियनचा पहिला गोल नोंदला गेला.
फ्लेमेंगोला भरपूर संधी मिळाल्या, तरी ब्राझिलियन क्लब त्यापैकी पुरेशा संधींचा फायदा घेऊ शकला नाही. त्यांच्या गर्सनने 32 व्या मिनिटाला पिछाडी एका गोलने कमी केली, पण त्यानंतर लिओन गोरेट्झकाने बायरनची आघाडी परत वाढविली. दुसऱ्या सत्रात जॉर्जिन्होने पेनल्टी रूपांतरित करून फ्लेमेन्गोचा दुसरा गोल केला. परंतु त्यानंतर केनने 73 व्या मिनिटाला आपला सामन्यातील दुसरा आणि स्पर्धेतील तिसरा गोल केला.