महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बायणा किनारी छट पुजा उत्सव उत्साहात साजरा,

12:23 PM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वास्को : बायणा समुद्र किनाऱ्यावर वर्षपध्दतीप्रमाणे यंदाही छटपुजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दाजी साळकर, माजी खासदार अॅङ नरेंद्र सावईकर, मुरगावचे नगराध्यक्ष गिरीष बोरकर व बरेच मान्यवर या उत्सवात सहभागी झाले होते. बायणा किनाऱ्यावर दरवर्षी छटपुजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. हजारो उत्तर भारतीय बंधू भगिनी या उत्सवात सहभागी होत असतात. रविवारी संध्याकाळी या उत्सवाला प्रारंभ झाला. मागच्या वर्षी प्रमाणे यंदाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उत्सवात हजेरी लावली. किनाऱ्यावरील गर्दीत त्यांनी फेरफटका मारला. उपस्थित लोकांना छटपुजेच्या शुभेच्छा दिल्या. बायणा किनाऱ्यावर छटपुजेनिमित्त खास कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. किनाऱ्यावर दारूकामाची आतषबाजीही करण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article