For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Chandrashekhar Bawankule On Sanjay Raut | 'सध्या अफवांचा बाजार गरम आहे...' चंद्रशेखर बावनकुळेंचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर!

03:12 PM Jul 12, 2026 IST | NEETA POTDAR
chandrashekhar bawankule on sanjay raut    सध्या अफवांचा बाजार गरम आहे     चंद्रशेखर बावनकुळेंचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर
Advertisement

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. त्यामुळे आता राज्याचे भावी मुख्यमंत्री कोण होणार यासाठी अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.. मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत अनेकांची नावे समोर येत आहेत.. यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आघाडीवर आहे. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे.. मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे सक्षम नेतृत्व आहेत तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही,असा दावा त्यांनी केला आहे..यावर आता महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रीया देत या चर्चांना पुर्णविराम दिला आहे..

Advertisement

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मिडीयावर एक पोस्ट शेअर करत म्हणले आहे, की‘सध्या अफवांचा बाजार गरम आहे. यातीलच अफवा आज पेरली गेली. त्याला बिनबुडाचे आकलन, म्हणावे लागेल. सूर्यप्रकाशाइतके एक सत्य आहे. महाराष्ट्राचे इन्फ्रामॅन. देवेंद्र फडणवीसजीच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहावेत, ही महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेची भावना आहे. विकसित महाराष्ट्राची हीच गरज आहे. मुख्यमंत्री होण्याची कुणीही घाई करू नये. असं ट्विट बावनकुळे यांनी केलं आहे.

Advertisement

काय म्हणाले संजय राऊत ?

मुख्यमंत्रिपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे सक्षम नेतृत्व आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला. तर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाही, असा पुनरूच्चार संजय राऊत यांनी केला. तर मीच ओरिजनल भाजपाई, भाजपचा संस्थापक असल्याचा दावा केल्यास ते मुख्यमंत्री होतील, असा खोचक टोला संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

Advertisement
Tags :

.