बॅटरीमुळे आहे जिवंत
अजब आजारामुळे महिलेवर ओढवले संकट, यंत्राच्या मदतीने हृदय आहे सक्रीय
अनेकदा आपण शरीर अन् स्वत:च्या प्रकृतीकडे लक्ष देत नाही. परंतु आजारी पडल्यावर आम्हाला शरीराचे मोल समजते. अमेरिकेतील एका महिलेला देखील स्वत:च्या शरीराचे महत्त्व आजारानंतरच उमगले आहे. मॅसाचुसेट्स येथे राहणारी महिला आता बॅटरीमुळे जिवंत आहे. तिला एक अजब आजार असल्याने तिची पल्स गेली असून आता ती एका यंत्राच्या मदतीने जगत आहे.
30 वर्षीय सोफिया हार्टला अत्यंत दुर्लभ जेनेटिक हार्ट कंडिशन आहे. यामुळे तिच्या पल्स नाहीत. अशा स्थितीत ती स्वत:साठी बॅटरीवर जिवंत असल्याचे म्हणते. तिला इररिव्हर्सिबल डायलेटेड कार्डियोम्योपथी नावाची कंडिशन आहे. हा हृदयाच्या मांसपेशींशी निगडित विकार असून यामुळे हार्ट फेल होऊ शकते.
तिला एक जीवन वाचविणाऱ्या वैद्यकीय यंत्रावर अवलंबून रहावे लागत आहे. या यंत्राला एलव्हीएडी (लेफ्ट वेन्ट्रीक्युलर असिस्ट डिव्हाइस) म्हटले जाते. या यंत्राद्वारे हृदय धडधडत असते. ती आता स्वत:वरील हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेची प्रतीक्षा करत आहे. एलव्हीएडी हृदयाच्या डाव्या हिस्स्याला पंप करण्यात यांत्रिक स्वरुपात सहाय्य करुन पूर्ण शरीरात रक्ताभिसरण कायम राखण्यास सहाय्य करते.
2022 साली घोड्यांच्या फार्मवर काम करताना सोफियाला स्वत:च्या या अजब आजाराविषयी कळले होते. तिला लवकर थकवा येत होता, सोफियाची जुळी बहिण देखील याच स्थितीसोबत जन्मली होती, परंतु सोफिया आजारी पडेपर्यंत तिलाही याचा सुगावा लागला नव्हता. ऑलिवियाला 7 वर्षांपूर्वीपर्यंत हृदयविकार होता. ऑलिवियावर 2016 साली हृदय प्रत्यारोपण झाले होते. आता सोफियाला देखील ऑलिवियासाठी वापरण्यात आलेल्या यंत्रावर अवलंबून रहावे लागत आहे.