For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खो-खो स्पर्धेत बसवाण्णा स्पोर्टस् जाफरवाडी संघ विजेता

09:57 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
खो खो स्पर्धेत  बसवाण्णा स्पोर्टस् जाफरवाडी संघ विजेता
Advertisement

मुलींमध्ये नवहिंद क्रीडा स्पोर्टस् येळ्ळूर संघाची बाजी

Advertisement

वार्ताहर /कडोली

येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रीडा केंद्र आयोजित खो-खो स्पर्धेत मुलांमध्ये श्री बसवाण्णा स्पोर्टस् जाफरवाडी तर मुलीमध्ये नवहिंद क्रीडा स्पोर्टस् येळ्ळूर संघानी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून यश संपादन केले. येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा केंद्राच्यावतीने गेले दोन दिवस झाले भव्य स्वरूपात मुलांसाठी आणि मुलींसाठी ओपण खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दिवसरात्र खेळविण्यात आलेले सर्वच सामने अंत्यत रोमहर्षक आणि अतितटीने झाल्याने समाधान व्यक्त होत होते. हजारो क्रीडा रसिकांनी या स्पर्धेसाठी हजेरी लावून आनंद लुटला. मुलांसाठी घेण्यात आलेल्या खो-खो स्पर्धेत एकूण महाराष्ट्र आणि कर्नाटकातील संघांनी भाग घेतला होता. शेवटच्या अंतिम सामन्यात बागलकोट संघावर जाफरवाडीच्या संघाने 4 मिनिटे वेळ राखून एकतर्फी विजय संपादन केला. त्यामुळे बागलकोट संघाला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

Advertisement

तर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेली लढत बरोबरीत झाल्याने विघ्नहर्ता महाराष्ट्र आणि श्री शिवाजी महाराज क्रीडा केंद्र यांना बक्षीस विभागून देण्यात आले. या स्पर्धेत बेस्ट रनर मौला अली अत्तार (बागलकोट) आणि बेस्ट चेंजर विनायक पाटील (जाफरवाडी) यांना देण्यात आला. तर मुलींमध्ये झालेल्या अंतिम खो-खो च्या सामन्यात नवहिंद क्रीडा केंद्र येळ्ळूर संघाने शिवाजी क्रीडा केंद्र कडोली संघावर मात करून यश संपादन केले. मुलींच्या खो-खो स्पर्धेत एकूण 7 संघानी भाग घेतला होता. यावेळी बेस्ट रनर सानिका गोरल (येळ्ळूर) आणि बेस्ट चेंजर चैत्राली सुर्यवंशी (कडोली) यांना देण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, जि. पं. माजी उपाध्यक्ष अरुण कटांबळे, अॅड. ए. एम. पाटील, माजी खेळाडू शांता गडकरी, वंदना पाटील, अॅड. शाम पाटील, गजानन कागणीकर, राजू मायाण्णा यांच्याहस्ते बक्षिस वाटप करण्यात आले. शिवाजी क्रीडा केंद्राचे अध्यक्ष सुनिल पावणोजी आणि सदस्यांनी स्पर्धा पार पडण्यासाठी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.