महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विधानसभा निवडणुकीपूर्वी 10 लहान रॉकेटसह ग्रेनेड, हातबॉम्ब, काडतुसे जप्त

Advertisement

वृत्तसंस्था//श्रीनगर

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी गुऊवार, 12 सप्टेंबर रोजी कुपवाडा, कुलगाम आणि पुलवामा जिह्यात लष्कराने दहशतवाद्यांचे तीन छुपे अड्डे शोधून काढले. कुपवाडा येथून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तसेच कुलगाम आणि पुलवामामध्ये केवळ लपण्याचे ठिकाण सापडले. कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये एका मोठ्या झाडाच्या मुळाशी 5 ते 6 फूट ख•ा खणून दहशतवाद्यांनी हे अड्डे तयार केल्याचे स्पष्ट झाले आहे. दहशतवाद्यांच्या अड्डयांमधून एक-47 ची 100 हून अधिक काडतुसे, 20 हातबॉम्ब आणि 10 छोटी रॉकेट सापडली आहेत. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली.

जम्मू-काश्मीरमध्ये तैनात असलेल्या निवडणूक निरीक्षकाकडून लष्कराला ही गुप्तचर माहिती मिळाली होती. काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी तीन टप्प्यात 90 विधानसभा जागांवर मतदान होणार आहे. 8 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे 6 दिवस उरले आहेत. अशा परिस्थितीत दहशतवादी कारवायाही वाढल्या आहेत. गेल्या चार दिवसात लष्कराने चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. याचदरम्यान पाकिस्तानी रेंजर्सकडूनही गोळीबार झाला. लष्कराच्या म्हणण्यानुसार निवडणुकांवर प्रभाव टाकण्यासाठी या घटना घडत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article