उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी बसवराज कस्तुरे
उमरगा :
उमरगा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी महायुती मधील भाजपचे नेते बसवराज पाटील यांचे निकटवर्तीय बसवराज कस्तुरे यांची तर उपसभापतिपदी शिवसेनेचे विजयकुमार माने यांची बुधवारी (ता. २९) रोजी बिनविरोध निवड करण्यात आली.
सभापती आणि उपसभापतीपदाच्या निवडीची प्रक्रिया प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक बी व्ही काळे यांच्या अध्यक्षतेखाली उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडली. नूतन सभापती व उपसभापतीचे सत्कार मावळते सभापती व उपसभापती यांनी केले. या निवडीमुळे शहरात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत महायुतीने बाजी मारली.
विशेष सभेला माजी सभापती संचालक रणधीर पवार, प्रल्हाद काळे, मारुती पाटील, सिद्धराम हत्तरगे, कृष्णा माने, सुभाष गायकवाड, सौ अहिल्याबाई जगदाळे, राजेंद्र तळखेडे, किरण कुकुर्डे, शरद माने, सौ सारिका कांबळे, विक्रम इंगळे, सचिन जाधव, बालाजी महावरकर, लक्ष्मण खराते आदी उपस्थित होते.
- अविश्वास ठराव आणण्यात आला
माजी सभापती रणधीर पवार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यात आला होता. त्यावेळी 18 पैकी 13 मध्ये विश्वास ठरावाच्या बाजूने व पाच विरोधात पडले होते.