बॅ. खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त कार्यालयीन अधीक्षक प्रदीप परब यांचे निधन
वेंगुर्ले (प्रतिनिधी)-
वेंगुर्ले शहरातील कॅम्प देऊळवाडा येथील रहिवासी व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे निवृत्त कार्यालयीन अधीक्षक प्रदीप मेघश्याम परब (68) यांचे गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुलगे, सुना, भाऊ, 2 बहिणी, पुतणे, पुतण्या, नातवंडे असा परिवार आहे. महिला औद्योगिक खात्या कामगार संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा परब यांचे ते पती, ॲड. संदीप परब व डॉ. वैभव (स्वप्नील) परब यांचे ते वडील तर जिल्हा परिषद लघु पाटबंधारे खात्यातील कर्मचारी सौ. समृद्धी साळगांवकर-परब व डॉन बास्को इंग्लिश स्कूल, ओरोसमधील शिक्षीका स्नेहल परब यांचे ते सासरे होत. तर सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक प्रकाश परब यांचे ते बंधू होत. तसेच स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी शेखर सावंत यांचे ते भावोजी व सामाजिक कार्यकर्ते लाला सावंत यांचे ते जावई होत.