For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pani Andolan | खंडित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ बारबोलेंचे आंदोलन

01:42 PM Jun 16, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
pani andolan   खंडित पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ बारबोलेंचे आंदोलन
Advertisement

खंडित पाणीपुरवठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड

Advertisement

नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान आणि नियोजन शून्य कारभारामुळे शहरवासीयांना १२-१३ दिवसांपर्यंत होत असलेल्या खंडित पाणीपुरवठ्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याच्या निषेधार्थ नगरपरिषदेतील विरोधी गटाचे प्रतोद कृष्णराज बारबोले यांनी नगरपरिषद इमारतीच्या गेटवर सहकाऱ्यांसह मडके आंदोलन केले.

यात भीषण पाणीटंचाई विरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे बार्शी नगर परिषदेचे विरोधी पक्षनेता नागेश अक्कलकोटे यांनी जाहीर केले. सत्तरीच्या दशकाप्रमाणेच बार्शी शहरात भीषण पाणीटंचाई पुन्हा उग्ररूप धारण केले.

Advertisement

उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा असूनही केवळ खात्याअंतर्गत समन्वयाचा अभाव आणि नियोजनशून्यतेमुळे १२-१३ दिवसांपर्यंत शहर पाणीपुरवठा लांबत चालल्याने ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी भटकंतीच्या दुहेरी संकटाला तोंड द्यावे लागत आहे.

नगरपरिषद प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने उपाययोजना केली नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता कसलेही आवाहन न करता अथवा निवेदन न देता बेधडक जनआंदोलन उभे केले जाण्याचा बार्शी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेता नागेश अक्कलकोटे यांनी बार्शी नगरपरिषद प्रशासनाला सज्जड इशारा दिला आहे.

Advertisement
Tags :

.