बार्बराची बॉलिवूडमध्ये पुनरागमनाची इच्छा
ऋतिक रोशनसोबत केले होते काम
विदेशी अभिनेत्री बार्बरा मोरीने 2010 मध्ये काइट्स या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिच्यासोबत ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. तरीही हा चित्रपट यशस्वी ठरला नव्हता. या फ्लॉप चित्रपटानंतर बार्बराने कुठल्याही हिंदी चित्रपटात काम केले नव्हते. परंतु बार्बरा आता पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करू इच्छित आहे.
काइट्स या चित्रपटातील बार्बराच्या हॉट लुकची चर्चा झाली, परंतु चित्रपटाची कहाणी कमजोर असल्याने तो यशस्वी ठरू शकला नव्हता. याचमुळे बार्बराने बॉलिवूडकडे पाठ फिरविली होती. परंतु आता बार्बरा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार आहे.
बॉलिवूडमध्ये पुन्हा काम करण्याची माझी इच्छा आहे. संधी मिळाली तर मी कमबॅकसाठी तयार असल्याचे तिने सांगितले. बार्बराचा चित्रपट ‘लुकाज वर्ल्ड’ अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात जुआन पाब्लो मेडिना देखील मुख्य भूमिकेत आहे. काइट्स चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी ऋतिक रोशन आणि बार्बरा हे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याची चर्चा होती.