For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : पिस्तुलाच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले

01:19 PM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
satara news    पिस्तुलाच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले
Advertisement

                                                  पिस्तुलाच्या धाकावर व्यापाऱ्याला लुटले

Advertisement

फेसबुक मार्केट प्लसवर स्वस्त गव्हाचे अमिष दाखवून व्यापाऱ्याला पिस्तुलचा धाक दाखवत मारहाण करत लुटणाऱ्या चौघांना बारामती पोलिसांनी अवध्या काही तासात जेरबंद केले. भिगवण आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनची मदत घेऊन थरारक पाठलाग करून चौघांकडून ८ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शिवाय त्यांच्याकडील दोन पिस्तुले व तीन जिवंत काडतुसेही जप्त केली.

या प्रकरणाची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, श्रीकांत अर्जुन घुले, अभिषेक भाऊसाहेब ठोंबरे (रा. खताळपट्टा ढेकळवाडी ता. बारामती) रवी संजय माने, अतुल मोहन भोलनकर (रा. कुंभारकरवस्ती वंजारवाडी ता.बारामती) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात सुरज सर्जेराव गावडे (२७, रा. तासगाव जि. सांगली) यांनी फिर्याद दिली.

Advertisement

त्यांच्या फिर्यादीनुसार, सुरज गावडे हे गव्हाच्या पिठाचा व्यवसाय करतात. फेसबुक मार्केट प्लसबर बाजारभावापेक्षा स्वस्त गहू अशी जाहिरात पाहून त्यांनी संबंधित बारामती पोलिसांनी अवघ्या काही तासात केली चौघांना अटक लिंकवर आपली माहिती भरली. त्यानंतर त्यांना खोट्या फेसबुक खात्यावरून ऑडिओ कॉल करत संपर्क करण्यात आला.

दि.४ रोजी सुरज गावडे संशयितांच्या सूचनेनुसार बारामतीत येथील एमआयडीसीतील पियाजियो कंपनीच्या पाठीमागील मोकळ्या जागेत आले. त्यानंतर त्यांना बिगर नंबरच्या स्कुटीवरून निर्जन ठिकाणी नेहले व मारहाण केली.त्यांना पिस्तुलचा धाक दाखवून रोख पैसे व दागिने असा सुमारे ५२ हजारांचा ऐवज घेऊन संशयित बेरणा कारमधून पळून गेले.

यानंतर सुरज गावडे यांनी बारामती पोलिसांत फिर्याद दाखल केली. तसेच संशयितांचे वर्णन सांगितले.यानंतर बारामती पोलिसांनी भिगवण व बालचंदनगर पोलिसांच्या मदतीने नाकाबंदी केली. संशयित पोलिसांना चकवा देत होते. परंतु अखेर भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिनारमास कंपनीजवळ मुद्देमालासह आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून ८ लाख १५ हजारांचा मुद्देमाल दोन पिस्तुल व तीन जिवंत काडतुसे जप्त केली. 

Advertisement
Tags :

.