बार असोसिएशन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली सूत्रे
बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक नुकतीच पार पडली असून नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे नूतन अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकारी मंडळाने सोमवारी बार असोसिएशनच्या कार्यालयात आपल्या पदांची सूत्रे स्वीकारली. अध्यक्षपदी अॅड. बी. जे. गंगाई, उपाध्यक्ष अॅड. पवन पाटील, अॅड. जयश्री मंड्रोळी, सरचिटणीस अॅड. सचिन शिवण्णावर, खजिनदार अॅड. निर्मला पाटील, सहसचिव अॅड. प्रशांत पाटील, कार्यकारिणी सदस्य अॅड. अभिषेक तारीहाळकर, अॅड. जी. ए. हिरेमठ, अॅड. मल्लाप्पा होळी, अॅड. वसंत हक्केण्णावर, अॅड. दीपा मर्डी, अॅड. राजश्री पाटील, अॅड. ज्योती पट्टणशेट्टी या सर्वांनी सोमवारी आपल्या पदांची सूत्रे स्वीकारली. दर तीन वर्षांतून एकदा बार असोसिएशनची निवडणूक पार पडते. मात्र, यावेळच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. वकिलांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून संबंधितांकडून वकिलांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिले आहे, त्या विश्वासाला पात्र राहून कार्य केले जाईल, अशी ग्वाही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी दिली.