For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बार असोसिएशनची आज निवडणूक

10:56 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बार असोसिएशनची आज निवडणूक
Advertisement

निवडणुकीची तयारी पूर्ण : मतदानानंतर सायंकाळी उशिराने होणार मतमोजणी : मतदारांना नोटाचाही पर्याय

Advertisement

बेळगाव : बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक शुक्रवार दि. 9 रोजी होत आहे. सकाळी 10 पासून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान घेतले जाणार आहे. या निवडणुकीची सर्व ती तयारी पूर्ण झाली असून मतदान झाल्यानंतर सायंकाळी उशिरा मतमोजणीलाही प्रारंभ केला जाणार आहे. यावेळी नोटाचाही पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी अॅड. आर. बी. मिरजकर यांनी दिली आहे. बेळगाव बार असोसिएशनची निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. 15 दिवसांपूर्वी निवडणूक जाहीर झाली होती. त्यानंतर वकिलांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली. एकूण 11 जागांसाठी ही निवडणूक होत असून 37 जण निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या आठ दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडाला होता. या निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 116 मतदार आहेत. जेएमएफसी न्यायालयातील वकील समुदाय भवन येथे मतदान घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. अध्यक्षपदाच्या एका जागेसाठी तीनजण रिंगणात आहेत. अॅड. सुधीर जैन, अॅड. एस. एस. किवडसण्णावर आणि अॅड. सुनील सानिकोप्प हे रिंगणात आहे. उपाध्यक्षपदाच्या दोन जागांसाठी अॅड. विनायक एस. गोटखिंडी, अॅड. बसवराज मल्लाप्पा मुगळी, अॅड. विजय व्ही. पाटील, अॅड. शीतल एम. रामशेट्टी, अॅड. एम. ए. सय्यद, अॅड. शिवाजी आर. शिंदे हे निवडणूक लढवित आहेत.

जनरल सेक्रेटरीसाठी अॅड. सतीश बिरादार, अॅड. देवराज बस्तवाडे, अॅड. वाय. के. दिवटे, अॅड. उमेशगौडा पाटील, अॅड. रविंद्र तोटीगेर हे निवडणूक लढवत आहेत. जॉईंट सेक्रेटरीसाठी अॅड. बाळकृष्ण कांबळे, अॅड. प्रशांत बी. पाटील, अॅड. विश्वनाथ बसवराज सुलतानपुरी, अॅड. प्रवीण उपाध्ये, कमिटी सदस्यांसाठी अॅड. सुमितकुमार अगसगी, अॅड. संतोष शिवबसाप्पा देसाई, अॅड. करभीर भीमाप्पा गस्ती, अॅड. सुवर्णा रामलिंगाप्पा होळी, अॅड. गणेश विठ्ठल कामकर, अॅड. सुरेश काडाप्पा नागनूर, अॅड. विनायक कल्लाप्पा नागनुरी, अॅड. अनिल शंकरगौडा पाटील, अॅड. पी. के. पवार, अॅड. पी. डी. पवार, अॅड. इराप्पा पुजेरी, अॅड. पी. जे. राजपूत, अॅड. विशाल अशोक ये•tर, महिला प्रतिनिधींसाठी कांचन राम गवळी, अॅड. अश्विनी विजय हवालदार, अॅड. रेणूकादेवी हेगनाईक, अॅड. शकुंतला जाधव, अॅड. चित्रा संजयकुमार पाटील निवडणूक लढवत आहेत. निवडणूक अधिकारी अॅड. आर. बी. मिरजकर यांनी सर्व ती तयारी पूर्ण केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून अर्ज स्वीकारण्याबरोबरच त्यांची छाननी केली आहे. चिन्हांचे वितरणही केले आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सर्व वकिलांनी जोरदार प्रचार केला आहे. या निवडणुकीची तयारी निवडणूक अधिकारी अॅड. आर. बी. मिरजकर यांनी केली आहे. याचबरोबर त्यांना सहकार्य करण्यासाठी अॅड. सुधीर सकरी, अॅड. अमृत कोल्हटकर, अॅड. प्रवीण रांगोळी, अॅड. बी. बी. तळवार, अॅड. विजयकुमार बेळगावी, अॅड. गजानन पाटील यांच्यासह 15 जण कार्यरत आहेत.

Advertisement

अंध व्यक्तीलाही मतदानाचा अधिकार...

एखादा मतदार अंध असेल तर त्या व्यक्तीलाही मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. अंध व्यक्तीसमोर उमेदवारांची नावे वाचून दाखविण्यात येणार आहेत. त्यामधील अंध व्यक्ती सांगेल त्या उमेदवाराला मतदान केले जाणार आहे.

नोटाचा पर्याय

बार असोसिएशनच्या निवडणुकीत नोटाचाही पर्याय मतदारांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच उमेदवारांना नोटा हाही प्रतिस्पर्धी ठरणार आहे. अध्यक्षपदासाठी एक मत दिल्यानंतर त्याच मतदान पत्रिकेमध्ये दुसरे मत नोटाला दिले तर ते मतदान रद्द ठरविण्यात येणार आहे. उपाध्यक्षपद किंवा इतर कोणत्याही प्रतिस्पर्धांमध्ये नोटाने अधिक मते घेतल्यास पुन्हा त्या जागेची निवडणूक घेण्यात येणार आहे.

रंगीत मतपत्रिका

एकूण 11 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. अध्यक्ष-1, उपाध्यक्ष-2, जनरल सेक्रेटरी-1, जॉईंट सेक्रेटरी-1, कमिटी सदस्य-5, महिला प्रतिनिधी-1 साठी मतदान घेतले जाणार आहे. या सर्वांसाठी विविध रंगांच्या मतपत्रिका, तसेच मतपेट्याही तयार करण्यात आल्या आहेत.

Advertisement
Tags :

.