For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बनवारीलाल पुरोहित यांचा राज्यपालपदाचा राजीनामा

07:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बनवारीलाल पुरोहित यांचा राज्यपालपदाचा राजीनामा
Advertisement

वैयक्तिक कारण असल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था /चंदीगड

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींना पाठवला असून त्यात वैयक्तिक कारणांचा उल्लेख केला आहे. ‘माझ्या वैयक्तिक कारणांमुळे आणि इतर काही वचनबद्धतेमुळे मी पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगडच्या केंद्रशासित प्रदेशाच्या प्रशासकपदाचा राजीनामा देत आहे’, असे पुरोहित यांनी स्पष्ट केले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बनवारीलाल पुरोहित त्यांनी आपले राजीनामापत्र सादर केले आहे. ऑगस्ट 2021 मध्ये त्यांनी पंजाबचे 36 वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती. त्यानंतर पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रविशंकर झा यांनी बनवारीलाल पुरोहित यांना पंजाब राजभवनात पदाची शपथ दिली. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी झालेल्या वादामुळे बनवारीलाल पुरोहितही चर्चेत होते. बनवारीलाल पुरोहित हे तीनवेळा लोकसभेचे खासदार राहिले आहेत. तसेच मध्य भारतातील सर्वात जुने इंग्रजी दैनिक ‘द हितवाद’चे व्यवस्थापकीय संपादक देखील होते. प्रख्यात शिक्षणतज्ञ, प्रसिद्ध समाजसेवक आणि राष्ट्रवादी विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. त्यांना सार्वजनिक जीवनाचा चार दशकांहून अधिक अनुभव आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.