For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता बदल हवो तर आमदार नवो ; सावंतवाडीत मंत्री केसरकरांविरोधी बॅनर

04:11 PM Oct 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
आता बदल हवो तर आमदार नवो   सावंतवाडीत मंत्री केसरकरांविरोधी बॅनर
Advertisement

बॅनर लावणाऱ्यांवर कारवाई करा ; शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची पोलिसात धाव

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

आता बदल हवो तर आमदार नवो हवो अशा आशयाचे बॅनर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञाताने सावंतवाडी शहरात ठीक ठिकाणी लावले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात असे असलेले हे बॅनर होते .परवानगी न घेता हे बॅनर लावण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेऊन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची बदनामी करणारे बॅनर लावणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाने केली आहे. यावेळी शिवसेनाप्रमुख अशोक दळवी ,महिला आघाडी प्रमुख नीता सावंत कविटकर, उपनगराध्यक्ष राजन पोकळे, तालुकाप्रमुख नारायण राणे, शहर प्रमुख हेमराज कुडतरकर ,उपतालुकाप्रमुख गजानन नाटेकर, भारती मोरे ,अनारोजिन लोबो ,विनायक दळवी ,आधी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते . मालवणी भाषेतून या बॅनर वर मजकूर होता. प्रिय दीपक भाईनु असा उल्लेख करत या बॅनर मधून केसरकर यांनी गेल्या पंधरा वर्षात मतदारांना दिलेल्या आश्वासनांचा पोलखोल करण्यात आला. केसरकर यांनी अनेक आश्वासने दिली . परंतु, त्यांची पूर्तता झाली नाही . केसरकारांकडून मतदारांची फसवणूकच झाली असल्याचे चित्र या बॅनर मधून उभे करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बॅनर लावण्यात आल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. तसेच मतदारांना बदल हवा तर आमदार नवा हवा असे आवाहन करण्यात आले आहे. हे बॅनर नगरपालिका प्रशासनाने सकाळी हटवले. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाने निरीक्षक अमोल चव्हाण यांची भेट घेऊन बॅनर लावणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केसरकर यांची बदनामी करण्यासाठी हा प्रकार करण्यात आला आहे . अशी बदनामी आम्ही खपवून घेणार नाही. प्रसंगी कायदा हातात घेऊ . असा इशारा शिवसैनिकांनी दिला . तसेच बॅनर वरील मजकूर पाहता त्यावरील भाषाशैली कोणाची हे ओळखता येते. अतृप्त आत्म्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा. संबंधितावर कारवाई करावी. सावंतवाडीतील वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न आहे. हे सर्वजण बाहेरील आहेत . सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.