For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मंद्रूपमध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाल्याचा साठा जप्त; दोघांना अटक

12:18 PM Oct 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंद्रूपमध्ये प्रतिबंधित गुटखा  पानमसाल्याचा साठा जप्त  दोघांना अटक
Advertisement
अभिजीत जवळकोटे

मंद्रूप : मंद्रूप पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा विक्रीसाठी साठा केल्याच्या आरोपावरून दोघांना अटक केली. या कारवाईत प्रतिबंधित पदार्थ, एक वाहन आणि पानमसाला तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री असा एकूण १ लाख ८० हजार ९५८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमवार, १२ ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे दहाच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

Advertisement

महिबूब महंमद हनीफ शेख (वय ४०, रा. मंद्रूप, ता. दक्षिण सोलापूर) आणि सद्दाम मकतुम मुल्ला (वय ३५, रा. बंदलगी बंधारा शिवार, ता. दक्षिण सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ अंतर्गत जारी केलेल्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व तत्सम पदार्थांचा विक्रीसाठी साठा केल्याचा आरोप संबंधितांवर आहे.

Advertisement

या कारवाईत विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू, चघळण्याची तंबाखू, बारीक सुपारी, चुना, रिकामे पाऊच, रबर पाकिटे, बॅग सीलर मशीन, वजनकाटे आणि सुपारी कापण्याचे मशीन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याशिवाय एमएच १३ डीएल ८७६६ क्रमांकाचे वाहनही पोलिसांनी ताब्यात घेतले.

याप्रकरणी मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४३६/२०२६ नुसार अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना १२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२.४९ वाजता अटक करण्यात आली.

अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अशोक यमनप्पा इलागेर यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मंद्रूप पोलीस ठाण्यात ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार करपे तपास करीत आहेत. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

.