बँकांसमोर सहा महिन्यात सर्वात मोठे ‘कॅश’चे संकट
ब्लूमबर्गच्या इकॉनॉमिक्स इंडेक्सनुसार माहिती : भविष्यात हे संकट मोठे हेण्याचे संकेत
नवी दिल्ली :
देशातील बँकांकडे कर्ज देण्यासाठी रोख रक्कमही कमी आहे. ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स इंडेक्सनुसार, भारतीय बँकांसमोर तरलतेची समस्या वाढत आहे. भविष्यात हे संकट मोठे होऊ होण्याचे संकेत आहेत. यामुळे बँकांना गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, कार कर्ज यांसारखी इतर प्रकारची कर्जे देताना अडचणी येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
रुपयाची घसरण आणि मोठ्या कंपन्यांकडून आगाऊ कर भरणे यामुळे आरबीआयकडे असलेले डॉलर कमी होत आहेत. त्यामुळे देशासमोर रोखीचे संकट आहे. बँकांच्या तुलनेत सहा महिन्यांत रोख रक्कमही मोठ्या प्रमाणावर कमी होत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय)कडून बँकांनी घेतलेल्या कर्जाच्या आधारे बँकांच्या रोख टंचाईचा अंदाज लावला जात आहे. ऑक्टोबर 2024 पासून, आरबीआयने डॉलरची विक्री वाढवली आहे, त्यामुळे रोखीचे संकट वाढत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीपर्यंत बँक 1.5 लाख कोटी रुपयांच्या रोखीच्या तुटवड्याने ग्रासली आहे.
रोखीचा तुटवडा का आहे, संकट का आहे?
ब्लूमबर्ग इकॉनॉमिक्स इंडेक्समध्ये असेही म्हटले आहे की, बँकांसमोरील तरलतेचे संकट नजीकच्या भविष्यात वाढू शकते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची सातत्याने होत असलेली घसरण रोखीच्या संकटामागे आहे. मंगळवारी रुपया 84.93 रुपयांवर गेला. रुपयाचे मूल्य संतुलित ठेवण्यासाठी आरबीआयकडून आणखी डॉलर्स विकले जाऊ शकतात. असे झाल्यास बँकिंग व्यवस्थेवर वाईट परिणाम होण्याचे संकेतही व्यक्त केले जात आहेत.