For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद

06:05 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
डिसेंबरमध्ये बँका 18 दिवस बंद
Advertisement

► वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

डिसेंबर महिन्यात बँका 18 दिवस बंद राहणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. बँकांना असणाऱ्या नियमित सुट्या, नैमित्तिक सुट्या आणि संपाचे दिवस असे मिळून सुट्यांचे हे दिवस आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (एआयबीईए) डिसेंबरात सहा दिवसांच्या बँक संपाची हाक दिली आहे. त्यामुळे या संघटनेच्या अंतर्गत येणाऱ्या बँका वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील.

यामुळे ज्यांना बँकांचे तातडीचे व्यवहार डिसेंब्             ारात करायचे आहेत, त्यांनी बँका बंद राहण्याच्या दिवसांची आधीच नोंद करुन ठेवावी आणि त्यानुसार बँकेचे व्यवहार करावेत. अन्यथा त्यांनी अडचण होणार आहे, असा इशारा बँक कर्मचारी संघटनेने दिला आहे. संघटनेने बँका बंद असण्याच्या दिवसांची सूची दिली आहे.

Advertisement

4 डिसेंबर : पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया

5 डिसेंबर : बँक ऑफ बरोडा, बँक ऑफ इंडिया

6 डिसेंबर : कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया

7 डिसेंबर : इंडियन बँक, युसीओ बँक

8 डिसेंबर : युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र

11 डिसेंबर : सर्व खासगी बँका

या शिवाय रिझर्व्ह बँकेने काही बँकांना डिसेंबरमध्ये सुट्या दिल्या आहेत.

1 डिसेंबर : अरुणाचल प्रदेश आणि नागालँडमधील बँका बंद

3 डिसेंबर : देशभरातील सर्व बँकांना रविवारची सुटी

4 डिसेंबर : गोव्यातील सर्व बँका बंद

9 डिसेंबर : दुसरा शनिवार असल्याने सर्व बँकांना सुटी

10 डिसेंबर : देशभरातील सर्व बँकांना रविवारची सुटी

12 डिसेंबर : मेघालयातील सर्व बँकांना सुटी

13 डिसेंबर : सिक्किममधील सर्व बँकांना सुटी

14 डिसेंबर : सिक्किममधील सर्व बँकांना सुटी

17 डिसेंबर : देशभरातील सर्व बँकांना रविवारची सुटी

18 डिसेंबर : मेघालयमधील सर्व बँकांना सुटी

19 डिसेंबर : गोव्यातील सर्व बँकांना सुटी

23 डिसेंबर : देशभरातील सर्व बँकांना चौथ्या शनिवारची सुटी

24 डिसेंबर : देशभरातील सर्व बँकांना रविवारची सुटी

25 डिसेंबर : देशभरातील सर्व बँकांना सुटी

26 डिसेंबर : मिझोराम, नागालँड आणि मेघालयमधील बँकांना सुटी

27 डिसेंबर : नारालँडमधील सर्व बँकांना सुटी

30 डिसेंबर : मेघालयमधील सर्व बँकांना सुटी

31 डिसेंबर : देशभरातील सर्व बँकांना रविवारची सुटी

Advertisement
Tags :

.