बँकिंग-दूरसंचार क्षेत्रातील नफाकमाईने घसरण
उच्चांकी प्रवासानंतर बाजार घसरला : सेन्सेक्स 35 अंकांनी प्रभावीत
मुंबई :
अधिकच्या उच्च मूल्यांकनासंदर्भातील काळजीच्या वातावरणामुळे चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी भारतीय भांडवली बाजारात बँकिंग व दूरसंचार क्षेत्रांमधील समभागांनी केलेल्या नफावसुलीमुळे अखेर बाजार घसरणीत बंद झाला आहे. यामुळे बाजारातील बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक अंतिमक्षणी घसरणीसह बंद झाले.
बाजारात मंगळवारी चढउतार राहिल्याचे दिसून आले. यामुळे सेन्सेक्स व निफ्टी यांच्यात काहीशी घसरण राहिली आहे. बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 34.74 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 0.04 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 79,441.45 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 18.10 अंकांनी घसरुन निर्देशांक 24,123.85 वर बंद झाला आहे.
मुख्य कंपन्यांमध्ये कोटक महिंद्रा बँक, भारती एअरटेल, इंडसइंड बँक, टाटा मोर्ट्स, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, स्टेट बँक आणि टायटन यांचे समभाग हे सर्वाधिक नुकसानीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये लार्सन अॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, टाटा कंसल्टन्सी सर्व्हिस, एचसीएल टेक आणि टाटा स्टील यांचे समभाग हे सर्वाधिक नफा कमाईत राहिले.
जागतिक बाजारांची स्थिती
आशियातील बाजारांमध्ये टोकीओ, शांघाय आणि हाँगकाँगचा बाजार सकारात्मक स्थितीत राहिला होता. तर सियोलचा बाजार प्रभावीत होत बंद झाला. यासोबत युरोपीय बाजार घसरणीसह बंद झाले. सोमवारी अमेरिकन बाजारात वधार होता. जागतिक बाजारात कच्चे तेल अर्थात ब्रेंट क्रूड 0.66 टक्क्यांनी वधारुन ते 87.17 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.
आगामी काळात जागतिक पातळीवरील स्थिती व देशांतर्गत घडामोडींच्या आधारे बाजाराची दिशा निश्चित होणार आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात बाजार कोणत्या दिशेने प्रवास करणार हे पहावे लागणार असल्याचे काही शेअर बाजार अभ्यासकांनी यावेळी म्हटले आहे.