कट्टा येथे 30 मे रोजी बँकिंग रोजगार मेळावा
भंडारी समाजाच्या युवक -युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन
शहर वार्ताहर/कुडाळ
सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाची रोजगार मेळाव्या संदर्भातील महत्वाची बैठक कुडाळ येथील सिध्दीविनायक सभागृहात जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि कार्यकारीणीचे पदाधिकारी, सर्व कार्यकारीणी सदस्य, पदसिद्ध सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. बँकिंग क्षेत्रातील रोजगार मेळावा 30 मे रोजी सकाळी 11 वाजता मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल कार्यालय (पेट्रोल पंप नजीक) येथे घेण्याचे बैठकीत सर्वांनुमते ठरविण्यात आले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात बँकिंग क्षेत्रातील भंडारी युवक-युवतींसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भंडारी युवक- युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्यावतीने करण्यात आले आहे. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचा जिल्हा भंडारी महासंघाच्यावतीने भंडारी महासंघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा भंडारी महासंघाचे अध्यक्ष हेमंत करंगुटकर, कार्याध्यक्ष राजू गवंडे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष समिल जळवी, माजी अध्यक्ष जिल्हा सदस्य रमण वायंगणकर,जि. प. सदस्य रुपेश पावसकर,जिल्हा सदस्य तथा सह सचिव प्रियदर्शन कुडव,जिल्हा सदस्य विकास वैद्य, निलेश गोवेकर, लक्ष्मीकांत मुंडये, निलेश गोवेकर, भरत आवळे, श्रीकांत वेंगुर्लेकर, विकास वैद्य, प्रवीण आचरेकर, चंदन पांगे, गजानन वेंगुर्लेकर अन्य भंडारी समाज बांधव उपस्थित होते. रोजगार मेळाव्यासंदर्भातील अधिक माहितीसाठी हेमंत करंगुटकर, रमण वायंगणकर, समील जळवी, राजू गवंडे, प्रियदर्शन कुडव मोबा-94233 52626 यांच्याशी संपर्क साधावा.