For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँकांचे समभाग वधारले

06:00 AM Oct 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
बँकांचे समभाग वधारले
Advertisement

मुंबई :

Advertisement

गेल्या दोन सत्रांमध्ये बँकांचे सहभाग जवळपास 5 टक्के तेजीत राहिले आहेत. याच दरम्यान निफ्टी 50 निर्देशांक जवळपास 0.5 टक्के इतकाच वाढला आहे. निफ्टी पीएसयु बँक निर्देशांक 3.5 टक्के इतका वाढलेला पाहायला मिळाला. यामध्ये शेअरबाजारात बँक ऑफ इंडियाने 5.4 टक्के वाढीसह आघाडी घेतली होती. यासोबत बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि युको बँक यांचे समभाग जवळपास 4 टक्के इतके वाढलेले दिसून आले. एसबीआयचा समभाग जवळपास 3 टक्के इतका वाढला होता.  सरकारने बँकांमध्ये विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 49 टक्के इतकी करणार असल्याचे म्हटल्याने त्याचे सकारात्मक परिणाम समभागांवर पाहायला मिळाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.