महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बँक, आर्थिक-वाहन क्षेत्रांमुळे बाजारात तेजी

06:24 AM Aug 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जागतिक संकेताचा परिणाम : सेन्सेक्स 378 अंकांनी मजबुत

Advertisement

मुंबई :

Advertisement

भारतीय भांडवली बाजारामध्ये चालू आठवड्यातील दुसऱ्या सत्रात मंगळवारी तेजीची नेंद झाली आहे. यामध्ये जागतिक बाजारामधील सकारात्मक संकेतामुळे व  बँक, आर्थिक व वाहन क्षेत्रांमधील कंपन्यांच्या समभागांच्या दमदार कामगिरीने बीएसई सेन्सेक्स व एनएसई निफ्टी यांचे निर्देशांक मजबूत होत बंद झाले आहेत.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 378.18 अंकांनी वधारुन निर्देशांक 80,802.86 वर बंद झाला आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा दिवसअखेर 126.20 अंकांनी वधारुन निर्देशांक 24,698.85 वर बंद झाला आहे.

सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 24 समभाग हे वधारले आहेत. यामध्ये बजाज फिनसर्व्ह, इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स आणि कोटक बँक यांचे समभाग सर्वाधिक तेजीत राहिले आहेत. यासोबत अॅक्सिस बँक, सनफार्मा, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, एशियन पेन्ट्स, स्टेट बँक, टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, लार्सन अॅण्ड टुब्रो, इन्फोसिस, मारुती सुझुकी, एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टायटन, हिंदुस्थान युनिलिव्हर, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, पॉवरग्रिड कॉर्प आणि टाटा स्टीलचे समभाग वधारले आहेत.

30 कंपन्यांच्या समभागांमधील फक्त 6 समभाग हे घसरणीत राहिले आहेत. यामध्ये भारती एअरटेल, आयटीसी, अदानी पोर्ट, जेएसडब्ल्यू स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट यांचे समभाग मोठ्या नुकसानीत राहिले. तर टाटा मोटर्स यांच्या समभागांनी घसरण नोंदवली.

जागतिक घडामोडींमध्ये इस्रायल व हमास यांच्यातील युद्धविरामच्या बातमीमुळे बाजारात तेजीचे वारे राहिले. राजकीय स्थिती व चीनमधील नकारात्मक कच्च्या तेलाची मागणी यामुळे किमतीमध्ये घसरण राहिली. याचा फायदा हा अर्थव्यवस्थेला झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे.  आशियातील बाजारांमध्ये सियोल व टोकीओ हे उच्च स्तरांवर बंद झाले. तर शांघाय व हाँगकाँग हे खालच्या पातळीवर बंद झाले. युरोपीय बाजार तेजीत राहिला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article