For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित तीन दिवसांचा संप स्थगित; बँक ग्राहकांना दिलासा

11:11 AM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
बँक कर्मचाऱ्यांचा प्रस्तावित तीन दिवसांचा संप स्थगित  बँक ग्राहकांना दिलासा
Advertisement

नवी दिल्ली : सरकारी बँक कर्मचारी संघटनांनी 28 सप्टेंबरपासून नियोजित केलेला तीन दिवसांचा देशव्यापी संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवारपासून सरकारी बँकांचे कामकाज नियमितपणे सुरू राहणार आहे.

Advertisement

27 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँकिंग असोसिएशन (IBA) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. या चर्चेदरम्यान दर महिन्याला आणखी दोन शनिवार सुट्टी देण्याच्या मागणीवर काही प्रमाणात सहमती झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या मागणीवर पुढील विचार करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन आयबीएकडून देण्यात आल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले.

Advertisement

पाच दिवसांचा कामाचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी देशातील सरकारी बँका तसेच प्रादेशिक ग्रामीण बँकांमधील कर्मचारी संघटनांनी 28 ते 30 सप्टेंबरदरम्यान तीन दिवसांच्या संपाची घोषणा केली होती. मात्र, आयबीएसोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप पुढे ढकलण्यात आला आहे.

त्यामुळे सोमवारपासून बँकांचे व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू राहणार असून, ग्राहकांना नियोजित संपामुळे होणारा व्यत्यय सध्या टळला आहे.

Advertisement
Tags :

.