For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cyber Fraud ची रक्कम ट्रान्सफरसाठी बॅंक खातेदारांना आमिष, काय आहे प्रकरण?

01:30 PM Jun 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
cyber fraud ची रक्कम ट्रान्सफरसाठी बॅंक खातेदारांना आमिष  काय आहे प्रकरण
Advertisement

खाती वापरण्यासाठी खातेधारकास कमिशन दिले जाते

Advertisement

By : आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : सायबर फ्रॉड करण्यासाठी भामट्यांकडून बैंक खातेदारांची खाती भाडेतत्वावर घेतली जात आहेत. या खातेदारांना फसवणुकीची रक्कम खात्यावर ट्रान्स्फर केल्यानंतर दोन ते १० टक्क्यापर्यंत कमिशन भामट्यांकडून दिले जात असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.

Advertisement

यासाठी सायबर भामटे पुणे, मुंबई यासारख्या मेट्रो सिटीजमधील चालु खात्याचा वापर करत आहेत. ही बाती देशभरातील विविध राज्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. सायबर फ्रॉड करण्यासाठी बहुतांशी वेळा चालू खात्यांचा वापर करण्यात येतो. ही खाती वापरण्यासाठी खातेधारकास कमिशन दिले जाते.

काही वेळा महिन्यासाठी ही खाती माझ्याने घेतली प्रत्येक खातेधारकाला २ ते १० टक्के कमिशन जातात. फसवणुकीची रक्कम फसवणूक झालेल्या खातेदाराकडून या खात्यावर घेतली जाते. यानंतर अवघ्या काही तासातच लाखो रुपयांची ही रक्कम अन्य खात्यांवर वर्ग करण्यात येते.

अशाच प्रकारे एका फसवणुकीसाठी १०० हून अधिक खात्यांचा वापर केला जातो. फर्स्ट लाईनला करेंट खाते नंतर सेटिंग खात्यांचा वापर फसवणुकीनंतर सायबर भामटे पहिल्यांदा फसवणुकीतील मोठी रक्कम वर्ग करण्यासाठी चालू खात्याचा वापर करतात. याला सायबर फ्रॉडच्या भाषेत फर्स्ट लाईनला असे म्हण्तात. यानंतर सेकंड लाईनला सेव्हिंग खात्यांचा वापर करण्यात येतो.

७ कोटी ८६ लाखांच्या फसवणुकीत ७ चालू खाती जुना राजवाडा येथे दाखल झालेल्या ७ कोटी ८६ लाख रुपयांच्या फसवणुकीतील ४ कोटी रुपयांची रक्कम चालू खात्यावर वर्ग केली आहे. काईटर हॉस्पिटॅलिटी अँड रियल इस्टेट प्रा. लि. चिंचवड ८५ लाख, मारुती इंटरप्रायजेस ९५ लाख रुपये, सह्याद्री ट्रेडर्स ८५ लाख, क्लासिक कन्स्ट्रक्शन ६० लाख, एएमजी ऑटो एजन्सी आंध्रप्रदेश ६० लाख, कश्यप विकलांग कले ६० लाख, सागर ट्रेडर्सवर ६० लाख रुपयांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

राजारामपुरी येथील फसवणुकीत सर्वच चालू खाती

राजारामपुरी येथे निवृत्त प्राध्यापिका मीना डोंगरे यांना डिजिटल अॅरेस्टची भीती घालून २८ मे रोजी ३ कोटी ५७ लाख रुपयांचा गंडा घातला होता. ही रक्कम ग्लोबल एंटरप्रायजेस, जे. के. एंटरप्रायझेस, मॉडर्न एंटरप्रायजेस, ए. के. कॉम्प्युटर प्रा. लि., गिरीधारी गोपाळ ट्रस्ट, न्यू देव इलेक्ट, कोरडाया एज्युकेशन, न्यू होय फाउंडेशन, शाकुबरी ट्रेडर्स, बेस्ट ब्रिगाट एज्युकेशन अँड सोशल ट्रस्ट या खात्यांवर वर्ग केली आहे.

चालू खात्यांचाच वापर का?

बॅंकमध्ये चालु खाते (करंट अकाऊंट) हे व्यावसायिक, उद्योजक त्यांच्या कंपनीच्या नावाने उघडत असतात. या खात्यावर व्यवहार करण्यास कोणतेही बंधन नसते. चालू खात्यावर व्यवहारासाठी रकमेची मयर्यादा नसते. तसेच कितीही वेळा व्यवहार करण्याची मुभा असते. वारंवार व्यवहार होत असल्यामुळे या खात्यांवर कोणालाही संशय येत नाही. या खात्यांवरुन रक्कम काढण्यासाठी कोणतीही मर्यादा नसल्यामुळे या खात्यांचा वापर करण्यात येतो.

२ ते १० टक्क्यांपर्यंत कमिशन

फसवणुकीची रक्कम वळविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खातेधारकांना सायबर चोरट्यांकडून कमिशन देण्यात येते. ही कमिशनची रक्कम २ ते १० टक्क्यांपर्यंत असते. ज्या चालू खात्यावर जास्तीत जास्त व्यवहार असतात, तसेच जास्तीत जास्त रकमेचे व्यवहार केले जातात अशाच खात्यांवर जास्त रक्कम वळविण्यात येते. अशा खातेधारकांना १० टक्के रक्कम कमिशन स्वरुपात दिली जाते. बचत खात्याचा वापर केल्यास २ ते ५ टक्के कमिशन देण्यात येते.

थोड्या पैशांसाठी जेलवारी

अशा प्रकारे बॅंक खाते वापरण्यास देऊन कमिशन घेतल्याचे तपासात सिद्ध झाल्यानंतर संबंधित बैंक खातेदारास फसवणुकीच्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात येत आहे. राजारामपुरी येथील मीना डोंगरे यांच्या फसवणुकीमध्येही ५ आरोपीना अटक केली आहे. यापैकी पूणे येथील एकाच्या खात्यावर ४५ लाख रुपयें जमा केले होते. पोलिसांनी त्याला अटक केली असून, सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

मेट्रोसिटीज मधील खात्यांचा वापर

फसवणुकीसाठी सायबर चोरटे मुंबई, पुणे, नाशिक चासह देशभरातील मेट्रोसिटीजमधील बॅंक खात्यांचा वापर करतात. मोठमोठ्या शहरातील चालू खात्यांवर मोठ्या रकमांचे व्यवहार होत असतात. यामधून फसवणुकीची रक्कम अन्य खात्यांवर वळविणे सोपे होते.

Advertisement
Tags :

.