महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशची भारतावर निसटती मात

06:46 AM Feb 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

Advertisement

19 वर्षाखालील वयोगटातील महिलांच्या सॅफ फुटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत येथे खेळविण्यात आलेल्या महत्त्वाच्या सामन्यात बांगलादेशने दुखापतीच्या कालावधीत एकमेव निर्णायक गोल करुन भारताचे आव्हान 1-0 असे संपुष्टात आणले.

Advertisement

या सामन्याला फुटबॉल शौकिनांची विक्रमी उपस्थिती होती. या सामन्यातील एकमेव निर्णायक गोल 92 व्या मिनिटाला (दुखापतीच्या कालावधीत) नोंदविला गेला. 2019 साली झालेल्या सामन्यातील आठवणी पुन्हा यावेळी जाग्या झाल्या. 2019 साली झालेल्या उभय संघातील अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा पराभव करत जेतेपद मिळविले होते. रविवारच्या सामन्यातील विजयामुळे बांगलादेश महिला फुटबॉल संघाने अंतिम फेरी गाठली आहे. सदर स्पर्धा 4 संघांमध्ये खेळविली जात असून राऊंड रॉबिन पद्धतीने सामने होत आहेत. बांगलादेशने 2 सामन्यातून 6 गुण मिळविले आहेत. तर भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील पुढील सामना नेपाळ बरोबर होणार आहे. या स्पर्धेतील भुतान विरुद्धच्या पहिल्या सामन्यात नेहा, शिबानीदेवी आणि सुलंजना राऊळ यांची कामगिरी दर्जेदार झाल्याने भारताने हा सामना जिंकला होता. मात्र रविवारच्या सामन्यात बांगलादेशची बचावफळी भक्कम असल्याने भारताला शेवटपर्यंत आपले खाते उघडता आले नाही. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता. बांगलादेशच्या अफिदाने भारतीय गोलरक्षक अनिकादेवीला हुलकावणी देत चेंडू अचूकपणे गोलपोस्टमध्ये धाडला. अफिदाचा हा एकमेव गोल निर्णायक ठरला.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media#sports
Next Article