For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आशियाई चॅम्पियनशिपसाठी बांगलादेशी नेमबाज भारतात येणार

06:00 AM Jan 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
आशियाई चॅम्पियनशिपसाठी बांगलादेशी नेमबाज भारतात येणार
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

नवी दिल्ली येथे 2 ते 14 फेब्रुवारी दरम्यान डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये होणाऱ्या शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये बांगलादेशचे दोन रायफल नेमबाज सहभागी होणार आहेत, यात 14 देशांतील 300 हून अधिक स्पर्धक सहभागी होतील. सुरक्षेच्या कारणास्तव टी-20 विश्वचषकासाठी आपला राष्ट्रीय क्रिकेट संघ भारतात पाठवण्यास नकार दिल्यानंतर काही दिवसांनी, बांगलादेश सरकारने पुढील महिन्यात होणाऱ्या आशियाई रायफल आणि पिस्तूल चॅम्पियनशिपसाठी आपल्या नेमबाजांना भारतात प्रवास करण्यास मंजुरी दिली आहे.

टी-20 विश्वचषक 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान भारत आणि श्रीलंकेतील विविध ठिकाणी होणार आहे तर शूटिंग चॅम्पियनशिप 2 ते 14 फेब्रुवारी दरम्यान डॉ. कर्णी सिंग शूटिंग रेंजमध्ये होणार आहे. यात 17 देशांतील 300 हून अधिक नेमबाज स्पर्धा करणार आहेत. बांगलादेशचे दोन रायफल नेमबाज तीन स्पर्धांमध्ये भाग घेतील. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने जागतिक टी-20 क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर बांगलादेशचे शूटिंग पथकही माघार घेईल, अशी अटकळ होती. तथापि नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाने बुधवारी स्पष्ट केले की बांगलादेशी नेमबाज सहभागी होतील.

Advertisement

Advertisement
Tags :

.