बांगलादेशी घुसखोरांना हाकला
सातारा :
बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहिम राबवून त्यांना या राज्यातून या देशातून आंतकवादी कारवाया करण्यापूर्वी हाकलून देण्यात यावे, अशी मागणी विविध हिंदू संघटनांच्यावतीने मागणी करण्यात आली. साताऱ्यात हिंदू संघटनांनी राजवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात महिलांचा मोठा सहभाग होता.
धर्माध घुसखोरांना बनावट ओळखपत्राद्वारे भारताची फसवणूक केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरा, भारतात रोहिंग्या, बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुखखोरांनी आतंकवादी कृत्ये करण्यापूर्वी त्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, महाराष्ट्रात बांगलादेशी घुसखोरांची शोधमोहिम राबवून त्यात स्थानिक हिंदू आणि स्वयंसेवी संघटनांचा सहभाग करुन घ्या, भारत का हिंदू शेर, बांगलादेशी घुसबैठीयोंको करेगा ढेर, अशा आशयाचे फलक महिलांनी घेतले होते. जोरदार घोषणा देत दुपारी ३.३० वाजता राजवाडा येथील गांधी मैदानावरुन मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा मोती चौक, पाचशे एक पाटी, पोलीस मुख्यालय मार्गे शिवतीर्थ, जिल्हाधिकारी कार्यालय असा पोहचला. जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मोर्चात सहभागी झालेल्यांना शिवाजीराव तुपे, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे सुशांत, हिंदू जनजागृती समितीच्या भक्ती डफळे यांच्यासह मान्यवरांनी जोरदारपणे आपल्या भाषणात बांगलादेशी घुसखोर हाकलून लावले पाहिजेत. त्यांना ज्या ज्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने दाखले काढुन मदत केली. सहकार्य केले. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, शोध मोहिम राबवून बांगलादेशी, रोहिंगे यांना तत्काळ या देशातून बाहेर काढण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
मोर्चामध्ये सहभाग नोंदवलेल्या प्रत्येक कार्यकर्त्यास अगोदर सूचना दिल्या होत्या. त्या सुचनांचे पालन सर्वच मोर्चेकऱ्यांनी केले होते. मोर्चा शिस्तबद्ध झाला.