बांगलादेशी घुसखोर गोळीबारात ठार
07:00 AM Dec 05, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न रोखला
Advertisement
वृत्तसंस्था/कोलकाता
Advertisement
भारत-बांगलादेश सीमेवर गुरुवारी पहाटे बीएसएफच्या गोळीबारात एका बांगलादेशी नागरिकाचा मृत्यू झाला. तस्करीत सहभागी असलेल्या एका इसमाने बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना ही दुर्घटना घडली. मृताचे नाव साबुज मिया (30) असे आहे. मध्यरात्री 8-10 बांगलादेशी तस्कर बेकायदेशीरपणे भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. बीएसएफच्या चेनाकाटा कॅम्पमधील एका गस्ती पथकाने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान बीएसएफने गोळीबार केल्याने साबुज मिया ठार झाला. मात्र, त्याच्यासोबतचे इतर बांगलादेशी लोक पळून गेले. या घटनेनंतर बीएसएफने मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर बांगलादेश बॉर्डर गार्ड (बीजीबी) ला मृतदेह परत करण्यासाठी बीएसएफने ध्वज बैठक घेण्याची विनंती केली आहे.
Advertisement
Next Article