बांग्लादेशी ग्रहण !
बांग्लादेशात खरेच Eिहदु धर्मसंकटात आहे. बांग्लादेशात झालेल्या सत्ताबदलामुळे दररोज हिंदुंवर अत्याचार सुऊ आहेत. याला सर्वस्वी पाकिस्तान आणि चीनची फुस आहे. आमने-सामनेच्या लढाईत भारतासमोर कधीच टिकाव लागणार नाही, हे पाकिस्तानी आयएसआय चांगले ओळखून आहे. यामुळे देशाला अस्ताव्यस्त करण्यासाठी बांग्लादेशातील फुटीरवाद्यांना हाताशी घेत त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. या षडयंत्रांची दुसरी तालीम देशात सुऊ असून, देशात अवैधरित्या राहत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांना जाळ्यात ओढत त्यांचा हेरगिरीसाठी वापर करण्यास सुऊवात केली आहे. यामुळे देशाला लागलेले बांग्लादेशी नागरिकांच्या ग्रहणाचे मुळापासून उच्चाटन होणे आवश्यक आहे.
बांग्लादेशातील अराजकतेच्या परिस्थतीची झळ देशाच्या कानाकोपऱ्यात बसण्यास सुऊवात झाली. बांग्लादेशात खुलेआम हिंदुंवर अन्याय, अत्याचार सुऊ आहेत. हिंदुंची मंदिरे जमीनदोस्त करण्याचे काम सुऊ आहे. मोहम्मद युनुस नावाच्या आंतरराष्ट्रीय नोबेल पारितोषिक विजेत्याने एवढी वर्षे चेहऱ्यावर ओढलेला बुरखा उतरवून ठेवत या अन्याय अत्याचाराला पाठिंबा देण्यास सुऊवात केली आहे. या सर्व घटनांना फुस असल्याशिवाय बांग्लादेशातील सरकार हे पाऊल उचलणार नाही. सध्या बांग्लादेशात सत्तेवर आलेले सरकार हे पाकिस्तान आणि चीन धार्जिणे आहे. यामुळेच हिंदुंवर खुलेआम अत्याचार सुऊ आहेत. मात्र बांग्लादेश एक बाब विसरत आहेत की त्यांचे जवळपास 30 टक्केहून अधिक नागरिक अवैधरित्या देशात राहत आहेत. अवैधरित्या राहणारे नागरिक पकडल्यानंतर देखील त्यांची व्यवस्थित रवानगी त्यांच्या देशात केली जाते. या नागरिकांना देशात कोणताही त्रास नाही. तर याउलट परिस्थिती बांग्लादेशात हिंदुंची आहे. देशात अवैधरित्या राहणारे अनेक बांग्लादेशी केवळ पोटा-पाण्यासाठी आले नाहीत. तर यातील काही पाकिस्तानसाठी आणि तेथील दहशतवादी संघटनांसाठी हेरगिरीचे देखील काम करीत असल्याचा संशय आहे. कारण यापूर्वी देशात अनेक बांग्लादेशी नागरिकांना हेरगिरी करताना अटक केली आहे. यामुळे देशाला लागलेल्या बांग्लादेशी नागरिकांच्या ग्रहणाला वेळीच लगाम घालणे आवश्यक आहे.
त्यासाठी जोरदार प्रयत्न मुंबई पोलिसांनी सुऊ केले आहेत. तर देशात बांग्लादेशी त्यातल्या त्यात रोहिंग्या मुसलमानांचा प्रश्न जटील बनत चालला आहे. रोहिंग्या मुसलमानाच्या विरोधात राज्याचे मंत्री असलेल्या नितेश राणे यांनी देखील जोरदार प्रहार करण्यास सुऊवात केली आहे. मध्यंतरी केरळ हे मिनी पाकिस्तान असल्याचे वक्तव्य करीत खळबळ उडवून दिली होती. आज देशाच्या अनेक राज्यात बांग्लादेशी नागरिकांनी बस्तान बसविले आहे. देशाच्या सुरक्षिततेला आणि अखंडतेला बांग्लादेशी नागरिकांमुळे भविष्यात बाधा येण्याची शक्यता आहे. यामुळे वेळीच पाऊल उचलणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे आमने-सामनेच्या लढाईत निभाव लागणार नाही, याची खात्री पटल्यानंतर पाकिस्तानी आयएसआयने (इंटर सर्व्हीस इंटेलिजन्स) धर्मांधतेच्या नावावर दहशतवादी पोसण्यास सुऊवात केली. या दहशतवाद्यांचे ब्रेन वॉश करीत, त्यांना सुसाईड बॉम्बर बनवून, देशात आत्मघाती हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यास सुऊवात झाली. मात्र प्रत्येक वेळी या आत्मघाती हल्ल्यात अपयश येण्यास सुऊवात झाल्याने, आयएसआयने घातकी खेळ खेळण्यास सुऊवात केली. ती म्हणजे, एखाद्या ठिकाणाला टार्गेट करायचे झाल्यास, त्या ठिकाणची रेकी करण्याचा घातकी कट. यासाठी आयएसआयने बांग्लादेशी नावाचे शस्त्र वापरण्यास सुऊवात केली आहे. म्हणजेच, देशात अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांना मनी आणि हनीचे अमिष दाखवून त्यांच्याकडून इप्सित माहिती काढून घेण्यास सुऊवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. आयएसआय हेरगिरीसाठी बांग्लादेशी नावाचे थर्ड आय वापरत असल्याचा सुगावा देशातील तपास यंत्रणांना लागल्याने, या सर्व तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
यापूर्वी देशातील तपास यंत्रणांनी आयएसआयचे देशातील एक रॅकेटच उद्धवस्त केले आहे. आयएसआयसाठी काम करणाऱ्यांमध्ये सीमा सुरक्षा दलाचा एक कर्मचारी त्याचप्रमाणे, दिल्लीतील महाविद्यालयात शिकविणारा एक प्राध्यापक याचा देखील समावेश होता. हा प्राध्यापक मुळचा बांग्लादेशी नागरिक असून, तो आयएसआयसाठी हेरगिरी करीत असल्याचे समोर आले होते. दिल्लीतील संवेदनशील माहितीचा पुरवठा आयएसआयकडे जात होता. यामुळेच अनेकदा आयएसआय देशात आत्मघाती हल्ले करण्यात यशस्वी होत होती. मात्र या बांग्लादेशी प्राध्यापकाचा बुरखा फाटल्याने, हे वास्तव समोर आले होते. सध्या बांग्लादेशातील परिस्थिती पाहता मुंबई पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांवर वक्रदृष्टी ठेवण्यास सऊवात केली आहे. नवी मुंबई, ठाणे, मिरा-भायंदर या ठिकाणी अवैधरित्या राहणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांची मोठी वस्ती आहे. तर काही बांग्लादेशी नागरिकांनी बनावट मतदान ओळखपत्रे, ज्या ठिकाणी राहत आहे, तेथील वास्तव्याचा पुरावा, लाईट बील हे सर्व अवैधरित्या बनवून घेतल्यानंतर नेमके हे बांग्लादेशी आहेत की, देशवासीय हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण या बांग्लादेशी नागरिकांना हाताशी धरत त्यांच्याकडून शहरातील अनेक संवेदनशील भागाची माहिती काढून घेण्याचा प्रयत्न आयएसआय कऊ शकते. कारण याबाबतीत आयएसआय ही कोणत्याही थराला उतरण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांच्या स्पेशल ब्रँचने गेल्या तीन वर्षात 696 बांग्लादेशी नागरिकांना अटक केली आहे. 1 जानेवारी 2024 ते सप्टेंबर कालावधीत 181 बांग्लादेशींना अटक करण्यात आली. त्यातील 133 जणांना परत पाठविण्यात आले. तर 2023 साली 368 बांग्लादेशींना अटक करण्यात आली असून, यातील 68 जणांना परत पाठविण्यात आले. तसेच 2022 साली 147 जणांना अटक करण्यात आली. त्यातील 21 जणांना परत करण्यात आले.
यामुळे भविष्यातील धोका ओळखून आत्ताच कामाला लागण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक वर्षी मुंबई पोलिसांची स्पेशल ब्रँच ही शहरात राहत असलेल्या बांग्लादेशी नागरिकांवर कारवाई करीत, त्यांना परत बांग्लादेशात पाठविण्याची व्यवस्था करते. मात्र असे अनेक हुशार बांग्लादेशी मागे राहत असून, काही बांग्लादेशी महिलांनी घरकामाच्या नावाखाली अनेक गर्भश्रीमंतांच्या घरांत प्रवेश मिळविला आहे. तर, शहरातील अनेक ठिकाणी बांग्लादेशी नागरिकांनी त्यांचे कुटुंबिय वसविले असून, त्यांच्या पत्नी या वेश्याव्यवसायात आहेत, तर हे पुऊष काही कामे करीत नाहीत, तर अनेकदा बाहेर फिरत असतात. यामुळे हे नेमके बाहेर काय करतात? यावर विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पत्नींना वेश्याव्यवसाय करण्यास लावून, ही बांग्लादेशी पुऊष मंडळी आयएसआयसाठी हेरगिरी तर करीत नाही ना? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आज घडीला शहरातील अनेक ठिकाणी बांग्लादेशी नागरिकांचे वास्तव्य आहे. यामुळे या बांग्लादेशी नागरिकांची अवस्था पाहता, त्यांचे अठरा विश्व दारिद्र्या लक्षात घेता, यांना आयएसआय हेरगिरीच्या कामाला देखील जुंपण्याची शक्यता आहे. कारण देश तसेच पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तसेच गुन्हेगारांचे आजमितीला बांग्लादेशात वास्तव्य आहे. त्यांच्या संपर्कातून आयएसआय या बांग्लदेशींना हेरगिरीसाठी थर्ड आय म्हणून वापरण्याची शक्यता आहे. यामुळे आयएसआयचे हे बांग्लादेशी थर्ड आय लवकरच हाणून पाडण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे.
अमोल राऊत