For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शस्त्रतस्करी करणारे बांगलादेशी, म्यानमारमधील बंडखोर ताब्यात

07:00 AM Jan 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
शस्त्रतस्करी करणारे बांगलादेशी  म्यानमारमधील बंडखोर ताब्यात
Advertisement

भारताच्या सीमेत सुरू होत्या अवैध कारवाया

Advertisement

वृत्तसंस्था/आइजोल

मिझोरम पोलिसांना भारत-बांगलादेश सीमेनजीक सुरू असलेल्या शस्त्रतस्करीप्रकरणी मोठे यश मिळाले आहे. मिझोरम पोलिसांनी गुप्तचर यंत्रणांसोबत मिळून ईशान्येद्वारे म्यानमारमधून बांगलादेशपर्यंत होत असलेल्या शस्त्रतस्करीप्रकरणी 5 जणांना अटक केली आहे. म्यानमार आणि बांगलादेशच्या दोन प्रमुख बंडखोर गटांदरम्यान हा शस्त्रास्त्र खरेदी-विक्रीचा प्रयत्न सुरू होता. पोलिसांनी म्यानमार येथील बंडखोर समूह चिन नॅशनल फ्रंटच्या एका नेत्यासमवेत पाच जणांना अटक केली आहे. पोलिसांनी मिझोरमच्या ममितनजीक एका गावात मोहीम राबविली, यादरम्यान पोलिसांनी 6 एके-47 रायफल्स आणि दारूगोळा हस्तगत केला. जप्त शस्त्रसामग्री  चिन नॅशनल फ्रंट, म्यानमार आणि युनायटेड पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट दरम्यान खरेदी-विक्रीसाठी आणली गेली होती, असे प्रारंभिक तपासात आढळून आले आहे. युनायटेट पीपल्स डेमोक्रेटिक फ्रंट बांगलादेशच्या चितगाव हिल्समध्ये सक्रीय एक बंडखोर समूह आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.