For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश युवा संघ जाहीर

06:35 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश युवा संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था / ढाका

Advertisement

झिम्बाब्वे आणि नामिबीया यांच्या संयुक्त यजमानपदाने होणाऱ्या आयसीसीच्या 19 वर्षांखालील वयोगटातील पुरूषांच्या विश्वचषक वनडे क्रिकेट स्पर्धेसाठी शनिवारी बांगलादेश संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व अझिझुल हकीमकडे सोपविण्यात आले असून झेवाद अब्रार उपकर्णधार राहील.

या स्पर्धेत बांगलादेश संघाचा ब गटात समावेश आहे. या गटामध्ये भारत, न्यूझीलंड, अमेरिका यांचाही सहभाग राहील. बांगलादेश संघाने आतापर्यंत युवा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 28 सामने खेळले असून त्यापैकी 17 सामने त्यांनी जिंकले आहेत.

Advertisement

बांगलादेश संघ: अझिझुल हकीम (कर्णधार), झेवाद अब्रार (उपकर्णधार), सामुईन बशीर, शेख परवेज, रिझान हुसेन, शहरीया अल अमिन, शादीन इस्लाम, मोहम्मद अब्दुल्ला, फरीद हसन, कलाम सिद्दकी, रिफाद बेग, साद इस्लाम, अल फहाद, शहरीयार अहमद, इक्बाल हुसेन.

Advertisement
Tags :

.