महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बांगलादेशचा थायलंडवर विजय

06:22 AM Jul 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसस्था/डंबुला

Advertisement

2024 च्या आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील सोमवारी येथे खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने थायलंडचा 15 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी पराभव केला. 14 धावांत 4 बळी टिपणाऱ्या रबीया खानला सामनावीराचा बहुमान मिळाला.

Advertisement

स्पर्धेतील हा आठवा सामना आहे. ब गटातील या सामन्यात थायलंडने नाणे फेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 बाद 96 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 17.3 षटकात 3 बाद 100 धावा जमवित हा सामना सहज जिंकला.

थायलंडच्या डावात सलामीच्या नाट्या बुचाथेमने 41 चेंडूत 4 चौकारांसह 40, लाओमीने 13 चेंडूत 2 चौकारांसह 17, कानोने 9 चेंडूत 1 चौकारासह 13 धावा जमविल्या. थायलंडच्या डावात 9 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे रबीया खानने 14 धावांत 4 तर रिटू मोनी व जस्मीन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. थायलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 25 धावा जमविल्या. थायलंडचे अर्धशतक 73 चेंडूत फलकावर लागले. थायलंडने 10 षटकात 2 बाद 38 धावा जमविल्या होत्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात मुर्शिदा खातुनने 55 चेंडूत 8 चौकारांसह 50 तर दिलारा अख्तरने 11 चेंडूत 3 चौकारांसह 17, इशामा तान्जीमने 16 धावा जमविल्या. खातून आणि तान्जीम यांनी पहिल्या गड्यासाठी 24 धावांची भागिदारी केली. अख्तर बाद झाल्यानंतर खातून आणि तान्जीम यांनी दुसऱ्या गड्यासाठी 60 धावांची भर घातली. रिटू मोनी व रुमाना अहम्मद यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. बांगलादेशाच्या डावात 12 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 39 धावा जमविताना 1 गडी गमविला. बांगलादेशचे अर्धशतक 49 चेंडूत तर शतक 105 चेंडूत नोंदविले गेले. बांगलादेशने 10 षटकात 1 बाद 61 धावा जमविल्या होत्या. थायलंडतर्फे पी.थिपाच्या आणि माया यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक: थायलंड 20 षटकात 9 बाद 96, (नाट्या बुचाथेम 40, लाओमी 17, कानो नाबाद 13, रबीया खान 4-14, जन्मीन 2-28, रिटू मोनी 2-10), बांगलादेश 17.3 षटकात 3 बाद 100 (दिलारा अख्तर 17, मुर्शिदा खातून 50, इशामा तान्जीम 16, रिटू मोनी नाबाद 9, रुमाना अहम्मद नाबाद 5, पी. थिपाचा व माया प्रत्येकी 1 बळी)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article