बांगलादेशचा अफगाणवर विजय
वृत्तसंस्था/ शारजा
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील येथे झालेल्या दुसऱ्या दिवस-रात्रीच्या सामन्यात बांगलादेशने अफगाणचा 68 धावांनी पराभव करुन बरोबरी साधली. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
या मालिकेतील पहिला सामना अफगाणने जिंकून आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 बाद 252 धावा जमविल्या. त्यानंतर अफगाणचा डाव 43.3 षटकात 184 धावांत आटोपला.
बांगलादेशच्या डावामध्ये कर्णधार नजमूल हुसेन शांतोने 1 षटकार आणि 6 चौकारांसह 76, टी. हसनने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 22, सौम्या सरकारने 2 षटकार आणि 2 चौकारांसह 35, मेहदी हसन मिराझने 22, रिदॉयने 1 चौकारासह 11, जाकर अलीने 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 37 तर नेसूम अहमदने 2 षटकार आणि 1 चौकारासह 25 धावा जमविल्या. अफगाणतर्फे एन. खरोटेने 28 धावांत 3 तर गझनफर आणि रशिद खान यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अफगाणच्या डावात रेहमत शहाने 76 चेंडूत 5 चौकारांसह 52, अटलने 5 चौकारांसह 39, कर्णधार शाहिदीने 1 चौकारासह 17, नईबने 1 षटकार आणि 4 चौकारांसह 26, नबीने 1 षटकारासह 17 आणि रशिद खानने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. बांगलादेशतर्फे नेसूम अहमदने 28 धावांत 3, मेहदी हसन मिराझ आणि मुस्ताफिजूर रेहमान यांनी प्रत्येकी 2 तसेच एस. इस्लाम आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक - बांगलादेश 50 षटकात 7 बाद 252 (नजमूल हुसेन शांतो 76, सरकार 35, जाकर अली 37, मेहदी हसन मिराज 22, नेसूम अहमद 25, खरोटे 3-28, गझनफर व रशिद खान प्रत्येकी 2 बळी).
अफगाण 43.3 षटकात सर्वबाद 184 (रेहमत शहा 52, अटल 39, नईब 26, नेसूम अहमद 3-28, मेहदी हसन मिराझ व मुस्ताफिजूर रेहमान प्रत्येकी 2 बळी, एस. इस्लाम आणि तस्किन अहमद प्रत्येकी 1 बळी.