For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश संघ जाहीर

06:12 AM Apr 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
पहिल्या कसोटीसाठी बांगलादेश संघ जाहीर
Advertisement

वृत्तसंस्था, ढाका

Advertisement

पाकिस्तान संघाविरुद्ध येथे 8 मे पासून सुरू होणाऱ्या पहिल्या क्रिकेट कसोटीसाठी क्रिकेट बांगलादेशने 15 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. सदर कसोटी मालिका 2025-27 च्या आयसीसी विश्व कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत राहील. या कसोटी सामन्यासाठी नजमुल हुसेन शांतोची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.  तर मेहदी हसन मिराजकडे उपकर्णधारपद राहील.

या कसोटी सामन्यासाठी बांगलादेश संघात तानझीद हसन आणि अमिते हसन या दोन नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. तानझीद हसनने यापूर्वी 34 वनडे आणि 45 टी-20 सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधीत्व करताना क्रिकेटच्या या दोन्ही प्रकारात 1900 पेक्षा अधिक धावा जमविल्या आहेत. आता तानझीद हसन कसोटी संघातील आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करेल.

Advertisement

24 वर्षीय अमिते हसन हा मधल्या फळीतील फलंदाज असून त्याने आतापर्यंत प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 49 धावांच्या सरासरीने धावा केल्या आहेत. तर त्याने 2019 साली क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. बांगलादेशच्या कसोटी संघामध्ये तस्किन अहमद आणि शोरीफुल इस्लाम यांचे पुनरागमन झाले आहे. तसेच नईम हसनचेही संघात पुनरागमन झाले आहे. विश्वकसोटी मानांकनात बांगलादेशचा संघ सध्या आठव्या स्थानावर आहे.

बांगलादेश कसोटी संघ- नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मेहमुद्दुल हसन जॉय, शदमान इस्लाम, मोमिनुल्ल हक, मुस्ताफिजुर रहीम, लिटन दास, मेहदीहसन मिराज (उपकर्णधार), ताजुल इस्लाम, नईम हसन, इबादोत हुसेन चौधरी, शोरीफुल इस्लाम, तस्किन अहमद, नाहीद राणा, तानजिद हसन आणि अमिते हसन.

Advertisement
Tags :

.