For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बांगलादेश-न्यूझीलंड दुसरा सामना पावसामुळे व्dया

06:00 AM Apr 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
बांगलादेश न्यूझीलंड दुसरा सामना पावसामुळे व्dया
Advertisement

वृत्तसंस्था/चट्टोग्राम

Advertisement

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना एकही चेंडू न टाकताच रद्द करावा लागला. बुधवारी दिवसभर चट्टोग्राम येथील मैदानावर कव्हर्स कायम ठेवण्यात आले हेते. पहिल्या सामन्यातील विजयानंतर बांगलादेशने तीन सामन्यांच्या या मालिकेत आपली 1-0 अशी आघाडी कायम राखली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे चट्टोग्रामच्या काही भागात पूरसदृश्य परिस्थितीही निर्माण झाली आहे. बांगलादेश आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ बुधवारी दुपारी मैदानावर दाखल झाले होते आणि काही खेळाडूंनी ‘इनडोअर नेट सेशन्स’मध्ये सरावात सहभाग घेतला होता. मात्र मैदानाबाहेरील हवामानाची परिस्थिती खेळण्यास अनुकूल नसल्यामुळे केवळ एवढाच सराव करणे शक्य झाले.

हे दोन्ही संघ गुरुवारी ढाक्यात दाखल होतील. या ठिकाणी 2 मे रोजी तिसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळवला जाईल. 27 एप्रिल रोजी चट्टोग्राम येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडने उभारलेल्या 182 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत बांगलादेशने सहा गडी राखून विजय मिळविला होता. कॉर्टीन क्लार्क आणि डेन क्लीव्हर यांनी अर्धशतके झळकविली असली तरी दहा षटकानंतर बांगलादेशची धावसंख्या 3 बाद 77 अशी होती आणि ते काहीसे अडचणीत सापडले होते. मात्र, तौहीद हृदोय, शमीम हुसेन आणि परवेझ हुसेन इमॉन यांनी एकत्रितपणे संघाला विजयापर्यंत नेले.

Advertisement

Advertisement
Tags :

.