For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारताच्या ट्रान्झिट कॉरिडॉरला बांगलादेशातून तीव्र विरोध

06:29 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारताच्या ट्रान्झिट कॉरिडॉरला बांगलादेशातून तीव्र विरोध
Advertisement

नाहिद इस्लाम यांच्या सभेत भारतविरोधी घोषणाबाजी

Advertisement

वृत्तसंस्था/ ढाका

बांगलादेशात भारताच्या ट्रान्झिट कॉरिडॉरला विरोध होत आहे. पंतप्रधान तारिक रहमान यांचे सरकार बांगलादेशात भारताला ट्रान्झिट कॉरिडॉर देण्याची तयारी करत असल्याचा आरोप शुक्रवारी विरोधी पक्षनेते नाहिद इस्लाम यांनी शुक्रवारी ढाका येथे एका सभेत केला. बांगलादेशची जमीन भारताला दिली जाणार नाही. ट्रान्झिट कॉरिडॉरचा उद्देश एका देशाची जमीन आणि रस्ते वापरून दुसऱ्या देशाच्या एका भागापर्यंत माल पोहोचवणे हा असतो. यामुळे अंतर आणि वाहतुकीचा वेळ कमी होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच नाहिद यांनी सरकारला गंगा पाणी करारावर कठोर भूमिका घेण्याचे आवाहनही केले. करारावर फेरवाटाघाटी करताना बांगलादेशच्या हिताचा विचार न केल्यास, लोक निषेधार्थ रस्त्यावर उतरतील, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement

नॅशनल सिटिझन पार्टीचे नेते नाहिद इस्लाम यांनी तारिक रहमान सरकारविरोधात ढाका येथे मोठ्या निदर्शनांचे नेतृत्व केले. वाढती महागाई, विजेचा तुटवडा आणि पेट्रोल, डिझेल व गॅसच्या तुटवड्यामुळे आंदोलक संतप्त झाले होते. याप्रसंगी त्यांनी गृहमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी आंदोलकांनी भारतविरोधी घोषणाबाजीही केली.

बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान जपान दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जपान आणि बांगलादेशने बंगालच्या उपसागराच्या आसपास व्यापार आणि वाहतूक वाढवण्यास सहमती दर्शवली. जपान बांगलादेशमध्ये मातारबारी नावाचे एक मोठे बंदरही बांधत आहे. यामुळे सागरी मार्गाने मालाची वाहतूक सुलभ होईल. जपानच्या एका योजनेनुसार, हे बंदर बांगलादेशमार्गे रस्ते आणि इतर कनेक्टिव्हिटी मार्गांनी भारताच्या ईशान्येकडील राज्यांशी जोडले जाऊ शकते. यामुळे भारताच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये मालाची वाहतूक सुलभ होऊ शकते. याव्यतिरिक्त आग्नेय आशियाई देशांसोबत भारताचा व्यापार वाढू शकतो. त्यामुळेच नाहिद इस्लाम यांनी या योजनेला विरोध दर्शवला आहे.

Advertisement
Tags :

.