बांगलादेश क्रिकेट संघाची घोषणा
वृत्तसंस्था/ ढाका
भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाने 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषक पुरुषांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी 15 सदस्यांचा बांगलादेश संघ जाहीर करण्यात आला. या स्पर्धेसाठी लिटन दासकडे कप्तानपदाची जबबादारी सोपविण्यात आली आहे.
या स्पर्धेत बांगलादेशचा संघ प्राथमिक टप्प्यात 4 सामने खेळणार आहे. त्यांचा पहिला सामना 7 फेब्रुवारीला विंडीज बरोबर, दुसरा सामना 9 फेब्रुवारीला इटली बरोबर, तिसरा सामना 14 फेब्रुवारीला इंग्लंड बरोबर तर चौथा सामना 17 फेब्रुवारीला नेपाळ बरोबर होणार आहे. सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील राजकीय संबंध तणावग्रस्त झाले असून असुरक्षित वाटत असल्याने बांगलादेशने या स्पर्धेतील आपले सामने लंकेमध्ये घेण्याची मागणी आयसीसीकडे केली आहे. या स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या बांगलादेश संघामध्ये वेगवान गोलंदाज तस्किन अहमदचे पुनरागमन झाले आहे.
बांगलादेश संघ-लिटन दास (कर्णधार), मोहम्मद सैफ हसन (उपकर्णधार), तानझिद हसन, मोहम्मद परवेझ हुसेन ईमॉन, टी. रिदॉय, शमीम हुसेन, काझी नुरुल हसन सोहन, शक मेहदी हसन, रिशान हुसेन, नेसुम अहमद, मुस्तफिजूर रेहमान, टी. हसन शकीब, तस्किन अहमद, मोहम्मद शैफुद्दीन, शोरिफुल इस्लाम.