For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑस्ट्रेलियाने काढला वचपा, बांगलादेश 64 धावांत ऑलआऊट

06:55 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑस्ट्रेलियाने काढला वचपा  बांगलादेश 64 धावांत ऑलआऊट
Advertisement

दुसरी कसोटी, पहिला दिवस : मिचेल स्टार्कचे 6 तर पॅट कमिन्सचे 3 बळी : कांगारुंचीही पडझड

Advertisement

वृत्तसंस्था/ मॅके

ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल 18 विकेट्स पडल्या. विशेष म्हणजे 18 पैकी 6 फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी अवघ्या 64 धावांत गुंडाळले. यानंतर ऑस्ट्रेलियाची अवस्थाही फारशी वेगळी राहिली नाही. दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 40 षटकांत 8 विकेट्स गमावत 165 धावा केल्या आहेत. कॅमरुन ग्रीन अर्धशतक झळकावत 51 धावांवर तर नॅथन लायन 10 धावांवर खेळत आहे.

Advertisement

मिचेल स्टार्कचे 6 बळी

नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या बांगलादेशला ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगलाच दणका दिला. मिचेल स्टार्कने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर शादमान इस्लामला ‘गोल्डन डक’वर (पहिल्याच चेंडूवर शुन्यावर) बाद केले. यानंतर पहिल्या कसोटीत शतक झळकावणाऱ्या तन्झिद हसनला स्टार्कने ‘थर्ड स्लिप‘वर ब्यू वेबस्टरकरवी झेलबाद केले, त्याला आपले खातेही उघडता आले नाही. पुढील चेंडूवर स्टार्कने बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोलाही माघारी पाठवले. सलामीचे दिग्गज झटपट बाद झाल्यानंतर मोमिनुल हक आणि लिटन दास या स्टार फलंदाजांनीही सपशेल निराशा केली. या दोघांनाही सातव्या षटकांत स्टार्कने बाद करत बांगलादेशची 5 बाद 12 अशी बिकट स्थिती केली.

स्टार्कच्या 5 विकेट्सनंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनेही बांगलादेशला सावरण्याची संधी दिली नाही. त्याने अनुभवी फलंदाज मुशफिकुर रहीमला बोल्ड केले. कमिन्सनेच मेहदी हसन मिराज आणि तस्कीन अहमदला तंबूचा रस्ता दाखवला. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लाम हा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. त्याने सर्वाधिक 14 धावा फटकावल्या. तैजुल इस्लाम 11 धावांवर नाबाद राहिला. विशेष म्हणजे, बांगलादेशची अवस्था इतकी बिकट होती की, अवघ्या 39 धावांवर त्यांचे 9 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. संघ आपल्या कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट होण्याच्या उंबरठ्यावर होता पण शोरिफुल इस्लामने तैजुल इस्लामसोबत अखेरच्या विकेटसाठी 25 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शोरिफुलने 14 धावांची खेळी करत बांगलादेशकडून सर्वाधिक धावा केल्या. त्यामुळे संघाला 64 धावांपर्यंत मजल मारता आली. बांगलादेशचा संपूर्ण संघ 34 षटकांत 64 धावांवर ऑलआऊट झाला. स्टार्कने अवघ्या 10 षटकांत केवळ 12 धावा देत तब्बल 6 विकेट्स घेतल्या. याशिवाय, पॅट कमिन्सने 3 तर जोश हेजलवूडने 1 विकेट घेतली.

बांगलादेशचाही पलटवार

64 धावांवर बांगलादेशचा डाव आटोपल्यानंतर ऑस्ट्रेलिया सहज आघाडी घेईल, असे वाटत होते. मात्र शोरिफुल इस्लामने यजमान ऑस्ट्रेलियाला जोरदार धक्के दिले. मॅट रेनशॉ अवघ्या 8 धावांवर तस्किन अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर शोरिफुलने आपल्या पहिल्याच षटकात ट्रॅव्हिस हेड (22) आणि मार्नस लाबुशेन (4) यांना बाद करत ऑस्ट्रेलियाला चांगलाच दणका दिला. यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ग्रीन यांनी चौथ्या विकेटसाठी 77 धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. ही जोडी मैदानावर जमलेली असतानाच शोरिफुलने स्मिथला 42 धावांवर माघारी पाठवले. त्याने 74 चेंडूत 6 चौकारासह 42 धावांचे योगदान दिले.

स्मिथ बाद झाल्यानंतर मात्र इतर ऑसी गोलंदाजांनी सपशेल नांगी टाकली.  अॅलेक्स कॅरी 5 धावांवर बाद झाला, तर ब्यू वेबस्टर आणि पॅट कमिन्स यांना भोपळाही फोडता आला नाही. यानंतर तर शोरिफुलने मिचेल स्टार्कला बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था आणखी बिकट केली. यानंतर नॅथन लियॉनने ग्रीनला साथ दिली. यादरम्यान, ग्रीनने आपले अर्धशतक पूर्ण करताना 8 चौकारासह नाबाद 51 धावा केल्या. लियॉन 10 धावांवर नाबाद राहिला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 40 षटकांत 8 बाद 165 धावा केल्या होत्या. ग्रीन 51 तर लियॉन 10 धावांवर खेळत होते. बांगलादेशकडून शोरिफुल इस्लामने 6 विकेट्स घेतल्या, तर मेहदी हसन मिराज आणि तस्किन अहमद यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली.

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश पहिला डाव 34 षटकांत सर्वबाद 64 (शादमान इस्लाम 0, तंझिद हासन 0, मोमिनल हक 9, नजमुल शांतो 0, मुशफिकुर रहीम 5, लिटन दास 0, मेहदी हसन मिराज 11, हसन मेहमूद 10, तैजुल इस्लाम नाबाद 11, शोरिफूल इस्लाम 14, मिचेल स्टार्क 14 धावांत 6 बळी, पॅट कमिन्स 25 धावांत 3 बळी, हेजलवूड 1 बळी).

ऑस्ट्रेलिया 40 षटकांत  8 बाद 165 (ट्रॅव्हिस हेड 22, रेनशॉ 8, लाबुशेन 4, स्टीव्ह स्मिथ 42, कॅमरुन ग्रीन नाबाद 51, अॅलेक्स केरी 5, नॅथन लियॉन नाबाद 10, शोरिफुल इस्लाम 6 बळी).

मिचेल स्टार्कचा विकेट्सचा धडाका

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज स्टार्कने वेग, स्विंग आणि सीमचा वापर करत बांगलादेशच्या टॉप ऑर्डरला सावरण्याची संधी दिली नाही. त्याने अवघ्या 12 धावांत 6 फलंदाज बाद केले. मिचेल स्टार्कने या कामगिरीसह दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज माजी वेगवान गोलंदाज डेल स्टेनला मागे टाकत, सर्वाधिक कसोटी बळी घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत पाचवे स्थान पटकावले. तर स्टार्क आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 10 व्या स्थानावर आहे. स्टार्कच्या नावावर आता 440 बळी आहेत, तर स्टेनच्या नावावर 439 बळी आहेत. इंग्लंडचा जेम्स अँडरसन 704 बळींसह या यादीत अव्वल स्थानावर आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये स्टार्कचे सर्वाधिक बळी

मिचेल स्टार्क हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. स्टार्कने 56 सामन्यात 230 गडी बाद केले आहेत. ही कामगिरी करताना त्याने आपलाच सहकारी गोलंदाज नॅथन लियॉनला मागे टाकले. लियॉनच्या नावे 57 सामन्यांमध्ये 225 गडी बाद केले आहेत तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स देखील सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत नॅथन लियॉनसोबत संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानी आहे.

Advertisement
Tags :

.